Mumbai Pune Missing Link Project : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई ते पुणे प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई पुणे महामार्गवरील वाहतूक घाट सेक्शन मध्ये एकत्र येत असते.
यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी होते. विशेषतः वीकेंडच्या काळामध्ये म्हणजेच शनिवारी आणि रविवारी घाटात कायमच गर्दी राहते. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे मुंबई ते पुणे प्रवास खूपच मंद होतो. शिवाय वाहतूक कोंडीमुळे अनेकदा अपघातांच्या देखील घटना घडतात.
हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार नाही सातवा वेतन आयोगाची थकबाकी? वाचा…
अशा परिस्थितीत ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाला मिसिंग लिंक प्रोजेक्ट म्हणून ओळखले जात आहे. या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जात असून या प्रकल्पासंदर्भात नुकतीच एक महत्वाची अपडेट हाती आली आहे.
एम एस आर डी सी ने हा प्रकल्प नेमका केव्हा सुरू होऊ शकतो? या संदर्भात नुकतीच एक मोठी अपडेट दिली आहे. तत्पूर्वी हा प्रकल्प नेमका कसा आहे? या संदर्भात आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! म्हाडाच्या घरासाठी कोण अर्ज करू शकत? अर्ज कुठं करावा लागणार? वाचा याविषयी ए टू झेड माहिती
कसा आहे मिसिंग लींक प्रोजेक्ट
या प्रकल्पअंतर्गत सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर ते खोपोली इंटरचेंज या ५.८६ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच या महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ किलोमिटर च्या राहिलेल्या लांबीसाठी १.६८ किलोमिटर आणि ८.८७ किलोमिटर लांबीचे दोन बोगदे आणि ०.९०० किलोमिटर, ०.६५० किलोमिटर व्हायाडक्टचे बांधकाम केले जात आहे. म्हणजे सध्याच्या महामार्गावर एकूण १९.८४ किलोमिटर लांबीचा ८ पदरी रस्ता बांधण्याचे काम महामंडळाने आपल्या हातात घेतले असून यामुळे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्थेपर्यंतचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई, नागपूर, पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ एक्सप्रेस ट्रेन रद्द, पहा यादी
या प्रकल्पामुळे या मार्गाचे अंतर कमी होणार असून प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होण्याची शक्यता आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मिसिंग लिंक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हा प्रवास अर्धा तास लवकर होणार आहे. निश्चितच मुंबई ते पुणे दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात आणि या प्रवाशांसाठी हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट फायदेशीर ठरणार आहे.
केव्हा सुरू होणार मिसिंग लिंक प्रोजेक्ट?
एम एस आर डी सी च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे 90% काम आजच्या घडीला पूर्ण झाले आहे. उर्वरित दहा टक्के काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.. त्यामुळे या प्रकल्पाचे संपूर्ण काम जून अखेरपर्यंत होणार आहे. एकंदरीत हा प्रकल्प जून महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेचच वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो असे चित्र तयार होत आहे.