Mumbai Pune Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. स्वस्तात, जलद आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान मुंबई नागपूर पुणे येथील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे भुसावळ मनमाड विभागातील नांदगाव स्थानकात रिमोल्डिंग चे काम केले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे कडून 29 मे आणि 30 मे रोजी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे भुसावळ-मनमाड मार्गावरील तब्बल आठ रेल्वे गाड्या रद्द होणार असून पाच रेल्वे गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, आज आपण कोणत्या आठ रेल्वे गाड्यां ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत आणि कोणत्या गाड्या वळविण्यात आल्या आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! बारावीनंतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या निकालाची तारीख जाहीर ? ‘या’ दिवशी लागणार रिजल्ट, वाचा….
कोणत्या गाड्या झाल्यात रद्द?
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच 29 मे 2023 रोजी भुसावळ मनमाड मार्गावरील रिमोल्डिंगच्या कामामुळे नागपूर-मुंबई, पुणे-भुसावळ, भुसावळ-देवळाली या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. साहजिकच या निर्णयामुळे या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
याव्यतिरिक्त रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मे 2023 रोजी या मेगाब्लॉकमुळे इगतपुरी पॅसेंजर, इगतपुरी भुसावळ पॅसेंजर, मुंबई-नागपूर एक्सप्रेस, देवळाली-भुसावळ एक्सप्रेस, भुसावळ-पुणे एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे. निश्चितच 30 मे रोजी या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! नवीन वंदे भारत मडगावकडे रवाना; केव्हा होणार उदघाट्न? पहा….
या गाड्यांच्या मार्गात होणार बदल?
मिळालेल्या माहितीनुसार 28 मे 2023 रोजी एनार्कुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस एनार्कुलम येथून रोहा, वसई, उधना, जळगाव मार्गे जाणार आहे.
तसेच 29 मे 2023 रोजी निजामुद्दीन-एनार्कुलम मंगला एक्सप्रेस जळगाव, उधना, वसई, रोहा मार्गे जाणार आहे.
तसेच 29 मे 2023 रोजी अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस भुसावळ कॉर्ड लाईन, अकोला मार्गे धावणार आहे.
30 मे 2023 रोजी नांदेड-निजामुद्दीन एक्सप्रेस अकोला भुसावळ मार्गे धावणार आहे.
याशिवाय नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस अकोला-भुसावळ मार्गे 30 मे 2019 रोजी धावणार आहे.
एकंदरीत मध्ये रेल्वेने घेतलेल्या या मेगाब्लॉकमुळे 28 मे, 29 मे आणि 30 मे रोजी या आठ रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! म्हाडाच्या घरासाठी कोण अर्ज करू शकत? अर्ज कुठं करावा लागणार? वाचा याविषयी ए टू झेड माहिती