Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईहुन एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, दरवर्षी सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
दरम्यान, याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर या सणासुदीच्या काळात अनेक जण श्रीक्षेत्र अयोध्या येथे देवदर्शनासाठी जात आहेत. मुंबईहुन प्रभू श्री राम रायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या राम भक्तांची संख्या खूपच अधिक आहे.
हेच कारण आहे की मुंबई ते अयोध्या दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे रामरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र अयोध्याला जाणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अयोध्या विशेष ट्रेन गाडी क्रमांक 01019 ही विशेष गाडी गुरुवारी अर्थातच २९.०८.२०२४ ला सीएसएमटी मुंबई येथून २३.२० वाजता सोडली जाणार आहे आणि अयोध्या छावणी या रेल्वेस्थानकावर तिसऱ्या दिवशी साडेनऊ वाजता पोहोचणार आहे.
तसेच गाडी क्रमांक 01020 ही अयोध्या- सी एस एम टी विशेष गाडी शनिवारी दि. ३१.०८.२०२४ ला अयोध्या छावणी येथून २३.४० वाजता सोडली जाणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे तिसऱ्या दिवशी सव्वा आठ वाजता पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा प्रयत्न झाला आहे.
ही गाडी या मार्गावरील कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर आणि लखनऊ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.