Mumbai Railway News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा पावन पर्व साजरा झाला आहे. आता लवकरच दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढणार आहे.
यामुळे आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबईहून बिहारच्या गया दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनल ते गया दरम्यान ही गाडी धावणार आहे. दिवाळीच्या काळात ही गाडी चालवली जाणार असून या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला महाराष्ट्रातील 9 रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय देखील प्रशासनाने घेतला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
लोकमान्य टिळक टर्मिनस ते गया दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी २५ ऑक्टोबरपासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३.१५ वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी गया येथे २२.५० वाजता पोहोचेल.
तसेच, गया ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस २३ ऑक्टोबरपासून दर बुधवारी गया येथून १९:०० वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०५:५० वाजता पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ?
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या विशेष गाडीला महाराष्ट्रातील कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया या नऊ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.