स्पेशल

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; अखेर ‘या’ रेल्वे स्थानकांच्या नावात झाला बदल, पहा कोणती आहेत स्थानके आणि काय आहेत नवीन नावे

Mumbai Railway Station Name Change : मुंबईकरांसाठी एक अतिमहत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईमधील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यात आली आहेत. मुंबईच्या काही महत्त्वाच्या मेट्रो रेल्वे स्टेशनच्या नावात आता मोठा बदल करण्यात आला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे राजधानी मुंबईसाठी अति महत्त्वाचा असा मेट्रो 2A मार्ग जानेवारी महिन्यात प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.

या मार्गाचे उद्घाटन दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे करण्यात आले. दरम्यान या मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर या मार्गांमधील असलेल्या काही मेट्रोस्थानकांची नावे बदलण्याची मागणी स्थानिकांच्या तसेच काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केली जात होती. या मागणीची दखल आता घेण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! अवकाळीच संकट अजून गेलेल नाही; ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस आणि गारपीट

या नुसार आता पहाडी एकसर, वळनई व पहाडी गोरेगाव या तीन प्रस्थानकांची नावे बदलण्यात आली असून त्यांचे नवीन नामकरण करण्यात आल आहे. यासंदर्भात एमएमआरडीए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सविस्तर असं परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आल आहे.

या परिपत्रकानुसार पहाडी गोरेगाव या मेट्रो स्थानकाचे नाव बांगुरनगर असं ठेवण्यात आला आहे. तसेच पहाडी एकसर या मेट्रोस्थानकाचे नाव आता शिंपोली मेट्रोस्थानक करण्यात आल आहे. याशिवाय वळणई स्थानकाचे नामांतरण करून वळनई-मीठ चौकी असं नवीन नाव या स्थानकाला देण्यात आल आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शिंदे सरकारने दिली 63 कोटींची मदत; केव्हा खात्यात जमा होणार? पहा…..

दरम्यान या मार्गावर असलेले लोअर मालाड स्थानकाचे देखील नाव बदलण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. खरं पाहता लोअर मालाड ज्या भागात स्थित आहे त्या ठिकाणी असलेल्या भागाला कस्तुरी पार्क म्हणून स्थानिक नागरिक ओळखत असतात.

त्यामुळे या लोअर मालाड या मेट्रोस्थानकाला कस्तुरी पार्क असं नाव दिलं पाहिजे अशी मागणी प्रवाशांची आहे. आता या मेट्रो मार्गावरील तीन स्थानकांची नावे बदलण्यात आली असल्याने लोअर मालाड या मेट्रोस्थानकाचे देखील लवकरच नाव बदलले जाईल आणि कस्तुरी पार्क असं नाव दिलं जाईल अशी शक्यता देखील यावेळी व्यक्त होत आहे. 

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी मोठी भरती सुरु, अर्ज कुठं करणार, पहा…..

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts