मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून ही ट्रेन मुंबई, शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नाशिक, ठाणे या मार्गे धावणार आहे. दरम्यान आज आपण वंदे भारत एक्सप्रेस चे टाईम टेबल आणि तिकिटाचे दर जाणून घेणार आहोत.
अस राहणार मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक
राजधानी मुंबईहून साईनगर शिर्डी या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस आनंदाची पर्वणी राहणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते शिर्डी दरम्यान सकाळी धावणार आहे. मुंबई येथून ही ट्रेन सकाळी सहा वाजून 15 मिनिटांनी (6:15 AM) शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे. आणि दुपारी ही ट्रेन शिर्डी या ठिकाणी पोहोचेल.
बारा वाजून 10 मिनिटांनी (12:10 PM) ही ट्रेन मुंबईला पोहोचणार आहे. तसेच शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन सायंकाळच्या वेळेला धावणार आहे. सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी (5:25 PM) ही ट्रेन शिर्डी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होईल. रात्री अकरा वाजून 18 मिनिटांनी (11:18 PM)ही ट्रेन मुंबई या ठिकाणी पोहोचेल. हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवार वगळता आठवड्याचे सर्व दिवस ही ट्रेन धावणार आहे.
मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे तिकिटाचे दर
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाकडून मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे तिकिटाचे दर ठरवण्यात आले आहेत. मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी चेअर कारसाठी 800 ते 1000 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1600 ते 1800 रुपये दर रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून आकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.