Dubai Train : भारतात रेल्वेचे खूप मोठे जाळे तयार झाले आहे. अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. कारण प्रवास खूप कमी खर्चिक असतो. परंतु आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही भारतातून दुबईला फक्त 2 तासात जाऊ शकता. कसे ते जाणून घ्या.
आता दुबई मध्ये राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण लवकरच भारतीय लोकांना पाण्याखालील ट्रेन प्रवासाचा आनंद घेता येईल. त्यांना काही तासांत दुबईला पोहोचता येईल. ही अंडरवॉटर ट्रेन समुद्राखालून दुबईला घेऊन जाते.
मुंबई ते दुबई
दरम्यान, यूएईची एक कंपनी आहे जी भारत आणि यूएईला समुद्राखाली जोडण्याच्या विचारात आहे, या कंपनीचे नाव नॅशनल अॅडव्हायझर ब्यूरो लिमिटेड असे आहे. या कंपनीला दोन्ही देशांना सागरी मार्गाने जोडायचे असून यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढू शकतील.
या प्रकल्पाच्या मदतीने कच्च्या तेलाची वाहतूक दुबईहून भारतात करता येऊ शकते. इतकेच नाही तर दोन्ही देशांतील नागरिकांना या ट्रेनच्या मदतीने प्रवास करणे सोपे होईल. याबाबत नॅशनल अॅडव्हायझरी ब्युरो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य सल्लागार अब्दुल्ला अलसेही यांनी UAE-इंडिया कॉन्क्लेव्ह दरम्यान या अंडरवॉटर ट्रेन प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार ही ट्रेन मुंबई शहर ते दुबईपर्यंत धावेल.
रेल्वे नेटवर्क
समजा भविष्यात या प्रकल्पाला पूर्ण मान्यता मिळाली तर या प्रकल्पात दुबईला मुंबईशी जोडण्यासाठी 2000 किलोमीटरपर्यंतचे रेल्वे नेटवर्क तयार होईल. याद्वारे कोणीही मुंबई ते दुबई 2 तासात जाऊ शकतो. या प्रकल्पात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये त्यासाठी यावेळी या आराखड्यावर जास्त विचार करण्याची गरज असेल असेही ते म्हणाले आहेत.
हे देश करत आहेत ट्रेनवर काम
UAE आणि भारत या दोन देशांशिवाय असे अनेक देश आहेत जे परस्पर व्यापार वाढवण्यासाठी पाण्याखालील ट्रेनवर काम करण्याची तयारी आहेत. या देशांत अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांचा समावेश सध्या जपान आणि चीन हे दोनच देश आहेत जिथे पाण्याखाली ट्रेन चालतात.