Mumbai Trans Harbour Link News : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळी रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. वास्तविक, हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई मधील नागरिकांसाठी अति महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा बहुतांशी वेळ वाचणार आहे.
मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवासासाठी हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अगदी मैलाचा दगड ठरणार असून यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वर एम एम आर टी ए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून टोलनाके बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
या मार्गावर एकूण आठ टोलनाके बसवले जाणार आहेत. शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान तयार होणारा हा 21 किलोमीटर लांबीचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प येत्या काही महिन्यात मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे. या मार्गाच्या 21 किलोमीटर अंतरापैकी जवळपास 18 किलोमीटरचे अंतर हे समुद्रावर आहे.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! अवकाळी पावसामुळे मान्सूनकाळात पर्जन्यमान कमी राहणार का? पहा या प्रश्नाचे उत्तर सविस्तर
हा मार्ग शिवडी येथे सुरू होऊन हा चिर्ले येथे संपणार आहे. म्हणजे मुंबई ते नवी मुंबईदरम्यान या मार्गाने प्रवास करता येणार आहे. या मार्गामुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर मात्र 40 मिनिटात कापता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वास्तविक हा प्रकल्प 31 मार्च अखेर पूर्ण होणार होता मात्र या प्रकल्पाच्या बांधकामास उशीर झाला असून जवळपास दोन महिने उशिरा या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होणार आहे.
बांधकामाव्यतिरिक्त या प्रकल्पात ऑगस्ट महिन्यापर्यंत इतर सुविधा उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठेवले होते. या अनुषंगाने आता या मार्गावर टोल नाके उभारले जाणार आहेत. यासाठीची निविदा देखील काढण्यात आली आहे. दरम्यान या निवेदेअंतर्गत निवड झालेल्या कॉन्ट्रॅक्टदाराला या मार्गावर आठ टोलनाके उभारावे लागणार आहेत.
निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख 22 मे 2023 ठेवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे हे टोल नाके ओपन रोड टोलिंग यंत्रणेने सुसज्ज राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आठ टोलनाक्यावर ही यंत्रणा असलेल्या 28 मार्गीका राहणार आहेत. या यंत्रणेमुळे वाहनचालकांना टोलनाक्यावर गाडी थांबवावी लागणार नाही तर ऑटोमॅटिक टोल कट केला जाणार आहे.
कसे राहतील टोल दर ?
एका प्रतिष्ठित रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करतांना कारसाठी शिवडी ते शिवाजीनगर दरम्यान 180 रुपये आकारले जातील, शिवाजीनगर ते चिरलेदरम्यान 60 रुपये आकारले जातील. तसेच तसेच शिवडी ते चिरलेदरम्यान संपूर्ण प्रवासासाठी 240 रुपये आकारले जातील.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वर हलक्या व्यवसायिक वाहनांसाठी शिवडी ते शिवाजीनगर दरम्यान 240 रुपये आकारले जातील. शिवाजीनगर ते चिरलेदरम्यान 70 रुपये आकारले जातील. शिवडी ते चिरलेदरम्यान संपूर्ण प्रवासासाठी 310 रुपये आकारले जातील.
तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वर बस आणि अवजड वाहनांसाठी शिवडी ते शिवाजीनगर दरम्यान 420 रुपये आकारले जातील. शिवाजीनगर ते चिरलेदरम्यान 130 रुपये आकारले जातील. शिवडी ते चिरलेदरम्यान संपूर्ण प्रवासासाठी 550 रुपये आकारले जातील.
बहुचाके असलेल्या वाहनांसाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वर प्रवासादरम्यान 780 रुपये टोल आकारला जाणार आहे. यामध्ये शिवडी ते शिवाजीनगर दरम्यान सहाशे रुपये आकारले जातील, तसेच शिवाजीनगर ते चिरलेदरम्यान 180 रुपये आकारले जाणार आहेत.
हे पण वाचा :- खुशखबर ! राज्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज, पहा कोणते युवक राहणार पात्र?