Mumbai Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईहून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर, राजधानी मुंबईला आत्तापर्यंत सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
विशेष म्हणजे या सर्व वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. यामुळे रेल्वेला जोरदार रिवेन्यू तर मिळतच आहे शिवाय प्रवाशांचा प्रवासही गतिमान आणि आरामदायी झाला आहे.
दरम्यान याच सहा वंदे भारत एक्सप्रेसपैकी एक मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा टाईम टेबल मध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे.
पश्चिम रेल्वे तर्फे चालवल्या जाणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक येत्या 24 ऑगस्ट पासून बदलणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22961) चे वेळापत्रक चेंज होणार आहे.
अशा परिस्थितीत आता आपण मुंबई ते अहमदाबाद अशी सेवा देणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेस चे नवीन वेळापत्रक कसे राहणार यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार नवीन टाईमटेबल ?
पश्चिम रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट पासून मुंबई सेंट्रल येथून ही वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी ३:४५ वाजता सुटणार आहे अन त्यानंतर बोरिवली येथे दुपारी ४:१० वाजता, वापी येथे सायंकाळी ५:४० वाजता, सुरत येथे सायंकाळी ६.३८ वाजता तर वडोदरा येथे रात्री ८:११ वाजता आणि अहमदाबाद येथे रात्री ९:१५ वाजता पोहोचणार आहे.
या गाडीचे फक्त वेळापत्रक बदलले आहे मात्र थांबे तेच राहणार आहे. आधी ही गाडी ज्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेत होती त्याच रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे.