स्पेशल

खुशखबर! राजधानी मुंबईलाही मिळणार वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट, कसा राहणार रूट?

Mumbai Vande Bharat Sleeper Train : बेंगळुरू आणि मुंबई दरम्यान लवकरच जलद गतीची ट्रेन सुरू होणार आहे. या दोन्ही शहरादरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. बेंगळुरू सेंट्रलचे खासदार, PC मोहन यांनी यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे.

2 डिसेंबर रोजी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या (SWR) स्थायी समितीच्या अभ्यास भेटीदरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. ते SMVT बेंगळुरूला मूळ/टर्मिनिंग स्टेशन म्हणून वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी जोर देत आहेत.

सध्या या मार्गावर सुरू असणाऱ्या विद्यमान ट्रेनला या दोन्हीं शहरादरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी २४-३० तास लागतात, तर बसला १६-१८ तास लागतात. यामुळे खासदार महोदयांनी या मार्गावर जलद ट्रेनची मागणी केली आहे.

दरम्यान एसडब्ल्यूआरचे महाव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव यांनी मोहन यांना दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, हे प्रकरण रेल्वे बोर्डाच्या अखत्यारीत येते. यामुळे आता मुंबई बेंगलोर वंदे भारत स्लीपर ट्रेन साठी रेल्वे बोर्डकडे काही पाठपुरावा केला जातो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

खरेतर, बेंगळुरू-मुंबई रेल्वे मार्गावर सध्या डझनभर गाड्या धावत आहेत, मात्र या मार्गावर KSR बेंगळुरू आणि CSMT मुंबईला जोडणारी उद्यान एक्स्प्रेस जी की कलबुर्गी मार्गे धावते हिच एकमात्र डेडिकेटेड ट्रेन आहे.

ही ट्रेन 1136 किमी अंतर 23 ते 24 तासांत कापते. याशिवाय, चालुक्य एक्स्प्रेस, जी पूर्वी यशवंतपूर आणि दादरला जोडली होती, ती तिरुनेलवेली आणि पुडुचेरीपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही गाडी आठवड्यातुन तीन दिवस धावते.

ही ट्रेन हुबली मार्गे धावते आणि या गाडीला या प्रवासासाठी सुमारे 24 तास लागतात. यामुळे मुंबई ते बेंगलोर दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. जर या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली तर मुंबई ते बेंगलोर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.

तथापि, या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याबाबतचा निर्णय हा रेल्वे बोर्डाकडून घेतला जाणार आहे. यामुळे रेल्वे बोर्ड या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहण्यासारखे ठरेल.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts