Nagpur Goa Expressway : मित्रांनो मुंबई नागपूर द्रुतगती महामार्ग अर्थातच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आता लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशा परिस्थितीत राज्यात लवकरच नागपूर गोवा महामार्गाच्या कामाचा श्री गणेशा होणार आहे.
दरम्यान या प्रस्तावित महामार्गाबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. मित्रांनो खरं पाहता प्रस्तावित नागपूर गोवा महामार्ग हा महाराष्ट्राच्या शेती क्षेत्राला, कृषी क्षेत्राला, पर्यटनक्षत्राला, उद्योग जगताला तसेच महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा महामार्ग राहणार आहे.
दरम्यान या महामार्गाची लांबी कमी करण्यासाठी नागपूर ते गोवापर्यंत असलेली बहुतांशी तीर्थक्षेत्रे या महामार्गाने जोडावी आणि अविकसित भागात वसलेल्या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा अनुषंगाने आमदार रणजीत सिंग यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे हा सदर प्रस्तावित महामार्ग अधिकाधिक तीर्थक्षेत्रातून गेला पाहिजे अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे आमदार रणजीत सिंग यांच्या या मागणीवर देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून हिरवा कंदील दाखवला आहे. मित्रांनो आमदार सिंग यांनी नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग अविकसित भागात वसलेल्या तीर्थक्षेत्राला जोडून गेला पाहिजे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक लेखी निवेदन दिल आहे.
मित्रांनो खरं पाहता हा प्रस्तावित महामार्ग सध्या वर्धा – यवतमाळ – नांदेड – लातूर – सोलापूर – मिरज – कोल्हापूर-पणजी असा असून हा 990 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. मात्र या महामार्गात सर्व तिर्थक्षेत्रे समाविष्ट करणे गरजेचे असल्याचे आमदार रणजीत सिंग यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच या मार्गात असलेले अविकसित तीर्थक्षेत्र सदर प्रस्तावित महामार्गाला जोडून नागपूर गोवा महामार्गाचे लांबी देखील कमी केली जाऊ शकणार आहे, असे मत आमदार रणजीत सिंग यांनी निवेदनात मांडले आहे.
मित्रांनो मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तीर्थक्षेत्र माहूर (रेणुकामाता देवी), तीर्थक्षेत्र अंबाजोगाई (योगेश्वरी देवी), परळी (वैजनाथ मंदिर)आदीचा समावेश या सदर नागपूर गोवा महामार्गात व्हावा अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात महामार्गाचा नवीन रूट देखील नमूद केला आहे.
आमदार रणजीत सिंग यांच्या मते सदर प्रस्तावित महामार्ग हा नागपूर पासून बुटीबोरी – वर्धा – महागाव – अर्धापूर अंबाजोगाई – परळी – कुर्डूवाडी – अकलूज – म्हसवड – विटा कोल्हापूर ते पणजी याप्रमाणे केल्यास राज्यातील बहुतांशी तीर्थक्षेत्र यां प्रस्तावित महामार्गला जोडले जाणार आहेत.
शिवाय पत्रात नमूद केलेल्या रूट प्रमाणे महामार्ग तयार केल्यास महामार्गाची लांबी कमी होऊन प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रणजीत सिंग यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला असल्याने लवकरच नागपूर गोवा महामार्ग आमदार रणजीत सिंग यांच्या रूट प्रमाणे तयार होणार असल्याचे चित्र आहे.