Nagpur Ratnagiri National Highway : नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरं पाहता, महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांचे, ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे चे, ग्रामीण भागातील रस्ते विकासाचे कामे जोमात सुरू आहेत. काही महामार्गांसाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे, काही ठिकाणी महामार्गाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे तर काही महामार्गसाठी भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांना वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनापोटी बाधित शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई वाटपाचा कार्यक्रम गाव निहाय शिबिर लावून घेण्यात येत आहे. खरं पाहता, हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्ह्यातून हा महामार्ग शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि हातकणंगले अशा चार तालुक्यात प्रस्तावित करण्यात आला आहे.
यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विकासाला मोठी गती लाभणार आहे. विशेषता या तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अजूनच मजबूत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान या तालुक्यातून ज्या गावात हा महामार्ग प्रस्तावित आहे त्या गावातील बाधित शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण की, या महामार्गासाठी आंबा ते चोकाकपर्यंत जमीनदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाचे कामकाज सुरु आहे.
आता त्याबाबतचे निवाडे देखील पूर्ण झाले आहेत. साहजिकच आता बाधित शेतकरी नुकसान भरपाईची वाट पाहत आहेत. अशातच आता शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी गावनिहाय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून म्हणजे 19 जानेवारीपासून शिबिर घेऊन महामार्गाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे.
अशी माहिती प्राधिकारी तथा भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.दरम्यान बाधित शेतकऱ्यांना ज्या दिवशी त्यांच्या गावात नुकसान भरपाईचे वाटप करण्याचे शिबिर असेल त्यादिवशी आवश्यक ते कागदपत्रांसहित हजर राहण्याचे आवाहन केले जात आहे.
गावनिहाय नुकसान भरपाई वाटपासाठी आयोजित केलेत शिबीर
19 जानेवारी : टोप (हातकणंगले), माले (हातकणंगले), चोकाक (हातकणंगले), नागांव (हातकणंगले)
20 जानेवारी : वडगांव (हातकणंगले), हेर्ले (हातकणंगले), केर्ले (करवीर), पडवळवाडी (करवीर)
21 जानेवारी : केर्ली (करवीर), निगवे दुमाला (करवीर), जठारवाडी (करवीर), कुशिरे तर्फ ठाणे (पन्हाळा)
22 जानेवारी : दाणेवाडी (पन्हाळा), पिंपळे तर्फ सातवे (पन्हाळा), बोरपाडळे (पन्हाळा), नावली (पन्हाळा)
23 जानेवारी : देवाळे (पन्हाळा), पैजारवाडी (पन्हाळा), आवळी (पन्हाळा), नेबापूर (पन्हाळा), आंबवडे (पन्हाळा).
24 जानेवारी : खुटाळवाडी (शाहूवाडी), डोणोली (शाहूवाडी), वाडीचरण (शाहूवाडी), चरण (शाहूवाडी)
25 जानेवारी : ठमकेवाडी (शाहूवाडी), बांबवडे (शाहूवाडी), गोगवे (शाहूवाडी), सावे (शाहूवाडी)
26 जानेवारी : भैरेवाडी (शाहूवाडी), करंजोशी (शाहूवाडी), ससेगांव (शाहूवाडी), कोपार्डे (शाहूवाडी)
27 जानेवारी : पेरीड (शाहूवाडी), कडवे (शाहूवाडी), जाधववाडी (शाहूवाडी), येलूर (शाहूवाडी)
28 जानेवारी : करुंगळे (शाहूवाडी), निळे (शाहूवाडी), वालूर (शाहूवाडी), वारुळ (शाहूवाडी)
29 जानेवारी : चांदोली (शाहूवाडी), केर्ले (शाहूवाडी), चनवाड (शाहूवाडी)
30 जानेवारी : आंबा (शाहूवाडी) व तळवडे (शाहूवाडी)