Nail Cutting Day : हिंदू वैदिक ज्योतिष शास्त्रात प्रत्येक गोष्टीचे वर्णन करण्यात आले आहे. कोणत्या गोष्टी शुभ आहेत कोणत्या गोष्टी अशुभ आहेत. यासोबतच कोणत्या गोष्टी कधी केल्या पाहिजेत या संदर्भातही वैदिक ज्योतिष शास्त्रात सविस्तर वर्णन तुम्हाला आढळेल. ज्योतिष शास्त्रात हाता-पायांची नखे कधी काढली गेली पाहिजेत ? नखे कधी काढू नयेत या संदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
यामुळे आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी तसेच जे लोक हिंदू वैदिक ज्योतिषशास्त्रात विश्वास ठेवतात अशा लोकांसाठी नखं काढण्याचा योग्य दिवस कोणता यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
नखं कधी कापू नयेत ?
सर्वप्रथम नखं कधी कापू नयेत याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. शास्त्रानुसार, अमावस्या आणि उपवास असेल त्या दिवशी चुकूनही नखे कापू नये. यासोबतच मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नख कापणे अशुभ मानले गेले आहे.
गुरुवार हा भगवान विष्णूचा वार आहे, यामुळे या दिवशी नखं कापणे टाळावे नाहीतर नात्यांमध्ये कटूता येण्याची भीती असते. मंगळवारी जर नखे काढलीत तर डोक्यावर कर्ज वाढण्याची भीती असते आणि रक्ताशी संबंधित आजार वाढतात.
शनिवारी नखे काढल्यास शनि देव कोपतात. यामुळे सांधेदुखी आणि पाठदुखीचा त्रास वाढतो. तसेच अचानक आजारपण येऊ शकते. यामुळे शनिवारी चुकूनही नखे काढू नयेत.
कोणत्या दिवशी नखे काढावीत ?
रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी तुम्ही नखे काढू शकता. पण या दिवशी उपवास नसावा. एकादशी चतुर्थी यांसारखे व्रत असल्यास या दिवशीही नखे काढू नये. या दिवशी अमावस्या असली तरीसुद्धा नखे काढणे टाळावे.
शास्त्रानुसार रविवारी नखे काढल्यास आर्थिक लाभ होतो. सोमवारी नखे काढल्यास आपल्यातील वाईट गुण दूर होतात आणि पैशांचा संचय वाढतो. बुधवारी नखं काढल्यास करिअरमध्ये चांगला ग्रोथ पाहायला मिळतो. शुक्रवारी नख काढल्यास नात्यांमध्ये गोडवा वाढतो.