Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना गेल्या वर्षी शिंदे सरकारने सुरू केली. या अंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत.
ज्या पद्धतीने पीएम किसान च्या पात्र लाभार्थ्यांना एका वर्षात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात अगदी त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एका वर्षात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात.
पीएम किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 18 हप्ते देण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब अशी की, या योजनेचा पुढील 19वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो ? या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा पुढल्या महिन्यात अर्थातच डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत आता अनेकांच्या माध्यमातून नमो शेतकरी चा पुढील हप्ता कधी जमा होणार असा सवाल उपस्थित होतोय.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा सत्ता स्थापित झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र असे असले तरी अजूनही महायुतीचा सीएम पदाचा चेहरा निश्चित होत नसून यामुळे शपथविधी सोहळा लांबणीवर पडला आहे. परंतु येत्या दोन-तीन दिवसात नवीन सरकार स्थापित करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
महायुती मधील काही नेत्यांनी पाच डिसेंबर पर्यंत महायुतीचे नवीन सरकार स्थापित होईल असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान महायुतीचे सरकार स्थापित झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबरच्या महिन्यात नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
नमो शेतकरी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण पाच हप्ते देण्यात आले आहेत. दरम्यान नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जमा होईल अशी शक्यता आहे.
एवढेच नाही तर पीएम किसान सन्माननीय योजनेचा पुढील हप्ता देखील डिसेंबर महिन्यातच जमा होणार असा अंदाज आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील पीएम किसान योजनेसाठी आणि नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात एकूण चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.