स्पेशल

नासाच्या तज्ज्ञांनी मंगळासाठी बनवले खास हेलिकॉप्टर!

Marathi News : खगोलतज्ज्ञांच्या कुंडलीत मंगळ अगदी फिट्ट बसला आहे. काही केले तरी मंगळ आपल्यावरून तज्ज्ञांचे लक्ष अजिबात विचलित होऊ देत नाही. संशोधकही मंगळाच्या भुरळीतून काही बाहेर येत नाहीत.

नासाच्या तज्ज्ञांनी मंगळासाठी खास हेलिकॉप्टर तयार केले आहे. नासाच्या इगन्यूटी हेलिकॉप्टरने मंगळावर भरारी घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी नव्या हेलिकॉप्टरची पृथ्वीवर चाचणी करण्यात आली.

नासाच्या इगन्यूटी हेलिकॉप्टरने यश दाखवल्यानंतर ड्रोनसदृश हेलिकॉप्टरची रचना केली जात आहे. इगन्यूटी हेलिकॉप्टरने मंगळ भूमीवर ६६ भराऱ्या घेतल्या. येत्या काळात आणखी होण्याची शक्यता आहे.

नव्या हेलिकॉप्टरची रचना जेट प्रोपलशन लॅब्रोटरी (जेपीएल) तयार करत आहे. सध्याच्या घडीला त्याच्या पंखांची चाचणी झाली. त्यांची लांबी ५० इंच आहे. याअगोदरच्या म्हणजेच इगन्यूटीपेक्षा त्याची लांबी चार इंचाने जास्त आहे.

प्रवासादरम्यान प्रचंड तापमानात देखील हेलिकॉप्टर सुरक्षित राहील याची काळजी घेण्यात आली असून किरणोत्सर्गापासून बचाव करण्याइतपत ते सक्षम असल्याचे नासाच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या हेलिकॉप्टरचे पंखे ध्वनीच्या वेगाने फिरणारे आहेत. इगन्यूटीने ६६ फुटांपर्यंत मंगळभूमीवर प्रवास केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नव्या हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यात आली.

इगन्यूटीने आतापर्यंत गाठलेली ही सर्वात जास्त उंची होती. नासाच्या प्रिझर्व्हन्स रोव्हरच्या मदतीने इगन्यूटी फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर पोहोचले. त्याच्यावर फक्त पाच वेळा मंगळ भूमीवर उडण्याची जबाबदारी होती. आतापर्यंत त्याने मंगळावर दोन तास हवेत घालवले आहेत. एकूण ९ मैलांचा प्रवास केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Marathi News

Recent Posts