Nashik Ring Road : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी नाशिक मध्ये बाह्य रिंग रोड उभारला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. 60 किमीच्या बाह्य रिंग रोड पाठोपाठ आता शहरात इनर रिंग रोड देखील विकसित केले जाणार आहेत. जवळपास 300 कोटी रुपये खर्चून 190 km लांबीचे इनर रिंग रोड नाशिक शहरात उभारण्याचा प्रस्ताव महापालिका कडून तयार करण्यात आला आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नाशिक मध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळाचे आयोजन होते. या कुंभमेळ्याला जगभरातून सनातन धर्म प्रचारक, भाविक हजेरी लावत असतात. अशा परिस्थितीत नाशिक शहरात वाहतूक कोंडीची समस्या कुंभमेळा दरम्यान सर्वाधिक जाणवते.
याच पार्श्वभूमीवर नासिक शहरात प्रवाशांच्या सोयीसाठी रिंग रोड उभारणे प्रस्तावित करण्यात आले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी 60 किलोमीटर लांबीच्या 10000 कोटी खर्चाचा बाहेर रिंग रोड उभारण्याबाबत माहिती समोर आली होती. दरम्यान आता शहरात महापालिकाकडून 190 किलोमीटर लांबीचे इनर रिंग रोड देखील विकसित केले जाणार आहेत.
विशेष बाब म्हणजे यासाठी महापालिकेला तब्बल 300 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. निधीची तरतूद झाल्यानंतर या इनर रिंग रोडच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. म्हणजेच कुंभमेळ्या दरम्यान शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी इनर रिंग रोडचा वापर होणार आहे तर कुंभमेळा दरम्यान जी काही शहराबाहेर जाणारी वाहतूक आहे ती बाह्य रिंग रोडवरन जाणार आहे.
खरं पाहता सिंहस्थ कुंभमेळा पाच वर्षानंतर नासिक मध्ये आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत महापालिकेकडून हालचाली तेज झाल्या आहेत. महापालिका बांधकाम विभागाकडून शहरातील इनर रिंग रोड साठी लवकरच प्रस्ताव तयार केला जाणारा असून आवश्यक निधीची मागणी राज्य शासनाकडे केली जाणार आहे.
असे राहतील नासिक शहरातील इनर रिंग रोड
नाशिक – पुणे, नाशिक – मुंबई, दिंडोरी रोड, पेठ रोड, त्र्यंबकेश्वर मार्ग, नाशिक – औरंगाबाद या राष्ट्रीय व राज्य महामार्गांशी शहरातून जाणारे इनर रिंगरोड जोडले जाणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. यामुळे सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिकाकडून केला जात आहे.