Navin Soyabean Bajarbhav : येत्या काही दिवसांनी सप्टेंबर महिन्याची सांगता होणार आहे. दरवर्षी सप्टेंबर एंडिंगला महाराष्ट्रात सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू होते. यावर्षी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर सोयाबीनची हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेचच आपला माल बाजारात विक्रीसाठी दाखल केला आहे.
यामुळे आता बाजारात काही प्रमाणात नवीन माल देखील चमकू लागला आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात नव्या सोयाबीनची आवक ही विजयादशमी नंतरच वाढणार आहे. अर्थातच पुढील महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात नवीन सोयाबीनची आवक वाढण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या महाराष्ट्रातील बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
राज्यातील बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती : आज मराठवाड्यातील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार या बाजारात आज सोयाबीनची तब्बल 3500 क्विंटल आवक झाली होती.
या सोयाबीनला किमान 4671, कमाल 4712 आणि सरासरी 4691 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. याशिवाय आज लातूर एपीएमसी मध्ये 90 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली होती. पिवळ्या सोयाबीनला या बाजारात किमान चार हजार तीनशे, कमाल 4750 आणि सरासरी 4523 असा भाव मिळाला आहे.
छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज 168 क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 3732, कमाल 4700 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती : विदर्भ विभागातील बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 100 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. मार्केटमध्ये आज पिवळ्या सोयाबीनला किमान 4200, कमाल 4500 आणि सरासरी 4350 असा भाव मिळाला.