स्पेशल

New Year Celebration: ‘या’ ठिकाणी जा आणि कमी बजेटमध्ये नवीन वर्ष साजरे करा! करता येईल फुल टू धमाल

New Year Celebration:- आता काही दिवसांनी 2023 या सरत्या वर्षाला निरोप द्यायची आणि 2024 या नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ जवळ आली असून या दृष्टिकोनातून अनेक जणांनी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची प्लॅनिंग केले असेल.

बरेच जण हे मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा किंवा इतर नैसर्गिक ठिकाणी जाण्याचा प्लॅनिंग करतात. परंतु अशा प्लॅनिंग करताना सगळ्यात आधी आपला खिशाचा बजेट पाहणे देखील तितकेच गरजेचे असते. कारण नवीन वर्षाचे स्वागत म्हटले म्हणजे यामध्ये पार्टी किंवा इतर भन्नाट कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते

व याकरिता बरेच जण बाहेर कुठेतरी फिरायला जायचं प्लॅन करतात. त्यामुळे आपल्याला परवडेल अशा ठिकाणी जाणे व त्या ठिकाणी भन्नाट असे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करता येईल या दृष्टिकोनातून सगळेजण प्लॅनिंग करत असतात. परंतु असे प्लॅनिंग करताना बऱ्याचदा कोणत्या ठिकाणी जावे?

यासाठी मोठा गोंधळ उडताना दिसून येतो. त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नसून तुम्हाला कमीत कमी बजेट मध्ये जर  नवीन वर्षाचे स्वागत धमाल असे करायचे असेल तर तुम्ही लेखात दिलेल्या ठिकाणांचा विचार करू शकतात.

 कमी बजेटमध्ये भारतातील हे ठिकाण नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आहेत फायद्याचे

1- मनाली आणि शिमला भारतातील मनाली आणि शिमला हे ठिकाणे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये येतात. तुम्हाला माहिती आहेस की ही दोन्ही पर्यटन स्थळे असून या ठिकाणी कायमच पर्यटकांची खूपच गर्दी असते. या ठिकाणी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात.

त्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये जर नवीन वर्ष साजरे करायचे असेल तर तुम्ही सिमला आणि मनाली या शहरांना भेट देऊ शकतात. नवीन वर्ष साजरी करण्याच्या आनंदासोबत तुम्ही मनाली या ठिकाणी सुंदर अशा वातावरणामध्ये स्केईग आणि ट्रेकिंगचा देखील आनंद घेऊ शकतात.

2- गोवा गोवा आपल्याला माहित आहे की या ठिकाणी वर्षभर फिरण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी या ठिकाणी असते. गोवा म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पटकन येते ते त्या ठिकाणचे नाईटलाइफ आणि पार्टी. तुम्हाला देखील जर येणाऱ्या 2024 ची सुरुवात सुंदर अशा अविस्मरणीय आठवणींनी करायचे असेल तर तुमच्यासाठी गोवा हे ठिकाण खूप छान राहील.

3- गोकर्ण गोकर्ण हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये येते. या ठिकाणी अद्भुत असे निसर्ग सौंदर्य असून ज्या व्यक्तींना निसर्ग सौंदर्य पाहण्याची इच्छा असते. अशा निसर्गप्रेमींसाठी गोकर्ण हे ठिकाण खूप छान आहे. ज्यांना कमीत कमी गर्दीमध्ये आरामशीर अशी पार्टी आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा आहे अशा व्यक्तींकरिता गोकर्ण हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

4- उदयपूर उदयपूर हे शहर राजस्थान राज्यांमध्ये असून याला लेक सिटी म्हणून देखील ओळखले जाते. या उदयपूर शहराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 31 डिसेंबरला मोठे यात्रेच्या आयोजन केलेले असते.

उदयपूर या ठिकाणी असलेले राजवाडे व किल्ले यांचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी या ठिकाणी किल्ल्यांच्या भिंतीवर आयोजित केला जाणारा लाईट अँड साऊंड शो बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.

या पद्धतीने या चार ठिकाणी जाऊन तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये नवीन वर्ष साजरे करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts