स्पेशल

विकास कामांमध्ये कमी पडणार नाही, खासदार नीलेश लंके यांची ग्वाही

पाच वर्षे आमदार असताना आपण पारनेर-नगर मतदारसंघात सुमारे १ हजार  ८०० कोटी रूपयांची विकास कामे मार्गी लावली. यापुढील काळातही आपण विकास कामांमध्ये कमी पडणार नाही अशी ग्वाही खासदार नीलेश लंके यांनी दिली.
कोहकडी येथील १ कोटी २४ लाख ७३ हजार रूपये खर्चाच्या खंडेकर मळा येथील कोल्हापुर पध्दतीच्या बंधाऱ्यांचे खा. लंके यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले, त्यावेळी खा. लंके हे बोलत होते.
यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, कोहकडी हा परिसर बागायत भाग आहे. या भागाला कुकडी कालव्याचे नियमित पाणी मिळावे यासाठी आपण यापूवही पुढाकार घेतला. यापुढील काळातही या भागाला पाणी कमी पडणार नाही. जेथे शक्य असेल तिथे पाणी आडविण्यास आपण प्राधान्य देणार आहोत. कोहकडी येथील टोणगेवाडी येथेही बंधारा मंजुर करण्यात आला असून त्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येईल अशी ग्वाही लंके यांनी दिली.
यावेळी सुदाम पवार, खंडू भुकन, अर्जुन भालेकर, गंगाराम बेलकर, प्रा. संजय लाकुडझोडे, कारभारी पोटघन, सरपंच सिमा पवार, वसंत कवाद, ठकाराम लंके, अमृताशेठ रसाळ, किसनराव रासकर, रूपेश ढवण, डॉ. आबासाहेब खोडदे, जालिंदर झरेकर, राजेश शेळके, जालिंदर तानवडे, नितिन चिकणे, भाउसाहेब आढाव, प्रदीप सोमवंशी, कांतीलाल शेळके,
अण्णा बढे, विलास मदगे, संभाजी मदगे, बापू मदगे, प्रविण उदमले, बाजीराव कारखिले, कैलास डोमे, दत्ता शेंडगे, लहानू टोणगे, रामदास चौधरी, मल्हारी धरणे, सर्जेराव चौधरी, गोरख टोणगे, वाल्मीक टोणगे, जयवंत गायकवाड, विशाल गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
पवार आमचे आधारस्तंभ
माजी सभापती सुदाम पवार हे आपले आधारस्तंभ आहे. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे माग लावण्यात त्यांचे योगदान आहे.   नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी येथे विकास कामांचे भुमिपुजन करण्यात येते. यंदाही विकास कामांचे भुमिपुजन करून ही परंपरा कायम ठेवण्यात आली. – खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य
कोहकडी येथील बंधाऱ्यांचे खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.
Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts