Netflix Subscription Free : अलीकडे बाजारात मनोरंजनाचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आधी फक्त थिएटरमध्ये जाऊन किंवा घरी Tv वर सिनेमा पाहता येत असे. आता मात्र सिनेमा, मालिका पाहण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. आता बाजारात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज, सिनेमां, मालिका पाहता येणे शक्य होत आहे. यासाठी मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन विकत घ्यावे लागते.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही वेब सिरीज आणि मालिका तसेच सिनेमा मोफत पाहण्याची सोय असते मात्र सदर प्लॅटफॉर्मवरील संपूर्ण कन्टेन्टचा ॲक्सेस मिळवण्यासाठी सबस्क्रीप्शन घेणे आवश्यक असते. हे ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मात्र खूपच महाग झाले आहे. नेट बॅलन्स आणि ओटीटीचे सबस्क्रीप्शन यामुळे सर्वसामान्यांचे चांगलीच गळचेपी होते. बाजारात डिज्नी प्लस हॉटस्टार, नेटफ्लिक्स इत्यादी ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मचे कंटेंट पाहण्यासाठी काही पैसे भरावे लागतात आणि सबस्क्रीप्शन विकत घ्यावे लागते.
दरम्यान जर तुम्हीही नेटफ्लिक्स वापरत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण Netflix चे सबस्क्रीप्शन मोफत कसे मिळवता येऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत. खरे तर अलीकडे बाजारात जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया या दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. या कंपन्यांमध्ये आता मोठे कॉम्पिटिशन वाढले आहे. यामुळे आता या दूरसंचार कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन लॉन्च केले जात आहेत.
यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या जीओने देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. जिओने असे काही प्लॅन लॉन्च केले आहेत ज्यामध्ये नेटफ्लिक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील ग्राहकांना मिळत आहे. दरम्यान आज आपण जिओचे असे दोन प्लॅन जाणून घेणार आहोत ज्यासोबत ग्राहकांना नेटफ्लिक्सचे सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे.
कोणत्या प्लॅन सोबत नेटफ्लिक्स सबस्क्रीप्शन मिळते मोफत
जिओने 1499 रुपयांचा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनने ग्राहकांनी रिचार्ज केला तर त्यांना 84 दिवसांसाठी दररोज तीन जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग चा लाभ मिळतो. तसेच दर दिवसाला शंभर एसएमएस देखील मिळतात. याशिवाय नेटफ्लेक्सची सबस्क्रीप्शन देखील मिळते. तसेच जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊड चे सबस्क्रीप्शन देखील ग्राहकांना मिळते. याशिवाय १०९९ रुपयांचा जिओचा प्लॅन देखील नेटफ्लेक्स सबस्क्रीप्शन ऑफर करत आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला दोन जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांचीच आहे. यामध्ये अनलिमिटेड डेटा आणि दिवसाला शंभर एसएमएस देखील दिले जातात. नेटफ्लिक्स सोबतच या प्लॅनने रिचार्ज केल्यास जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचे देखील सबस्क्रीप्शन मिळते.