अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने जगभरात तणावाचं वातावरण आहे.याच दरम्यान, एका अॅडल्ट मॉडेलने युक्रेनच्या सैनिकांसाठी ऑफर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते की,
जो सैनिक एका रशियन सैनिकाला मारेल, त्याला ती न्यूड फोटो पाठवेल, जो कोणी एक रशियन टँक नष्ट करेल त्याला ती एक व्हिडीओ पाठवेल आणि जो कोणी रशियाचं एक विमान पाडेल,
त्याच्यासोबत ती एक रात्र रोमान्स करेल. ही मॉडेल सध्या तिच्या या विचित्र ऑफरमुळे चांगलीच चर्चेत आहे. दरम्यान या अडल्ट स्टारने रशियन सैनिकांना देखील अशीच एक विचित्र ऑफर दिली आहे.
जर रशियन सैनिकांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आदेश धुडकावून लावले, तर ती असं करणाऱ्या सैनिकासोबत रोमान्स करेल, असं तिनं म्हटलंय. ट्विटरवर बॅड किट्टी नावाने प्रसिद्ध असलेली मॉडेल लिली समर्स सध्या तिच्या या विधानामुळे चर्चेत आहे.
जेव्हापासून रशिया आणि युक्रेनमध्ये वाद सुरू झाला तेव्हापासून ती ट्विटरवर वादग्रस्त ट्विट करत आहे. ती युक्रेनला पाठिंबा देत असल्याचं तिच्या पोस्टवरून कळतंय. युक्रेनने युद्ध जिंकावं, यासाठी आता ती रशियन सैन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्सही देत आहे.