Numerology News : हात पाहून ज्या प्रमाणे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाऊ शकते त्याचप्रमाणे फक्त व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचे भूत, वर्तमान आणि भविष्य देखील सांगितले जाऊ शकते.
अंक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या फक्त जन्मतारखेवरून त्याचे भविष्य सांगितले जाऊ शकते. जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? त्याचे करिअर, पैसा, पद, लग्न अशा सर्वच गोष्टी जाणून घेता येतात.
अंक ज्योतिष ही ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा आहे. अंक ज्योतिषमध्ये व्यक्तीच्या मुलांकाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अंक ज्योतिष असे सांगते की व्यक्तीच्या मुलांकावरून त्याचे वर्तमान, त्याचे भूतकाळ आणि भविष्यकाळ बऱ्याच प्रमाणात जाणून घेता येऊ शकते.
मुळांक हा व्यक्तीच्या जन्मतारखेवरून समजतो. व्यक्तीचा मुळांक हा 1 ते 9 यादरम्यान असतो. हा मुळांक जन्मतारखेंवरून काढला जातो. दरम्यान आज आपण मुळांक 2 विषयी जाणून घेणार आहोत. मुळांक दोन हा कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोकांचा असतो.
अंक ज्योतिष शास्त्रानुसार मूळांक दोन असणाऱ्या मुली खूपच भाग्यवान असतात. या चार तारखांना जन्मलेल्या मुली आपल्या नशिबाच्या जोरावर आपल्या आई वडिलांचे तर भाग्य बदलताच सोबतच आपल्या पतीचे आणि सासरच्या लोकांचेही भाग्य बदलतात.
लग्नानंतर या मुलींना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळतात. या मुली लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना प्रामाणिकपणे मदत करतात. यामुळे या मुली एक आदर्श मुलगी, एक आदर्श पत्नी अन एक आदर्श सून म्हणून ओळखल्या जातात. यांचा पायगुण हा खूपच चांगला असतो.
जेव्हा या मुलींचे लग्न होते तेव्हा यांचे नशीब अधिक जोर पकडते. लग्नानंतर या मुली वाईट तसेच चांगल्या काळात आपला नवरा आणि सासरच्या लोकांच्या मागे ठामपणे उभ्या राहतात.
पती तसेच आपल्या सासरच्या लोकांची काळजी घेणे हे आपले कर्तव्यच आहे असं समजतात. या मुली खूपच भाग्यवान असतात आणि म्हणून ज्या घरात या मुली जातात त्या घराचे नंदनवन होते.
या मुली प्रत्येकचं क्षेत्रात चांगले नावलौकिक कमवतात. यांना भरपूर यश आणि पैसा मिळतो. या मुलांकाच्या मुली नेहमीच दुसऱ्यांना मदत करतात. या मुली सहजतेने दुसऱ्यांना आकर्षित करतात.
त्या अतिशय हुशार, मनमिळावू मोकळ्या मनाच्या असतात. दुसऱ्यांचे मन लगेच ओळखतात. यामुळे ज्या घरात या मुली जातात त्या घराचे स्वर्ग बनते असं म्हणतात.