स्पेशल

Numerology: आयुष्यात पैसे कसे कमवायचे हे ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना बरोबर माहीत असते! या लोकांकडे नसते पैशांची कमी

Numerology:- ज्योतिषशास्त्र व अंकशास्त्र यांना खूप महत्त्व असून या शास्त्रांच्या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव, त्याचे स्वभाव गुण तसेच त्याचे व्यक्तिमत्व आणि आयुष्यात त्या व्यक्तीचा जीवनक्रम कसा राहील? व्यक्ती किती यशस्वी होईल? याबद्दलची माहिती आपल्याला कळत असते.

ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म दिनांक तसेच जन्माची वेळ व इतर गोष्टींवरून त्याचे भविष्य,भविष्यकालीन जीवन इत्यादी बाबत आपल्याला माहिती मिळत असते तर अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा  जन्म कोणत्या तारखेला झालेला आहे त्या जन्मतारखे वरून आपल्याला त्याचा मूलांक पाहिला जातो व त्यानुसार त्या व्यक्तीचे भविष्य किंवा जीवन तसेच त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे राहील याबाबतची माहिती आपल्याला मिळत असते.

त्याचप्रमाणे जर आपण अंकशास्त्रानुसार बघितले तर कोणत्याही महिन्याच्या पंधरा, 24 आणि सहा तारखेला जन्मलेल्या लोकांच्या बाबतीत देखील महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते व या तारखेला जन्मलेले लोक कसे असतात याबाबतची माहिती आपण घेऊ शकतो.

 प्रचंड पैसा कमावतात या तारखेला जन्मलेले लोक

अंकशास्त्रानुसार बघितले तर कोणत्याही महिन्याच्या 15,6 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा सहा असतो. आपल्याला माहित आहे की जन्मतारखेमध्ये येणाऱ्या दोन अंकांच्या बेरजेवरून मुलांक काढला जातो. या ठिकाणी 24 तारखेला जन्म झालेला असेल तर 2+4=6 अशाप्रकारे सहा मुलांक येतो.

सहा मुलांक असलेले व्यक्ती हे खूप हुशार असतात व त्यांचे व्यक्तिमत्व देखील विशेष व खास असते. मुलांक सहाचा स्वामी शुक्र असून कोणत्याही महिन्याच्या 6,15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांवर शुक्राचा प्रभाव असतो व त्यामुळे हे व्यक्ती फार श्रीमंत असतात आयुष्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची पैशांची चणचण जाणवत नाही.

 या लोकांमध्ये असतात महत्त्वाच्या गोष्टी

1- पैसे कमावण्याची असते अक्कल सहा मुलांक असलेले व्यक्ती हे डोक्याने फार स्मार्ट असतात व कामात देखील त्या या स्मार्टनेसचा वापर करून पैसे मोठ्या प्रमाणावर मिळवतात. आयुष्यामध्ये पैसे कसे कमवायचे हे त्यांना बरोबर माहिती असते व या व्यक्तींकडे एकापेक्षा जास्त आर्थिक कमाईचे स्त्रोत उपलब्ध असतात.

2- आयुष्यात मिळते चांगली प्रसिद्धी सहा मुलांक असलेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रसिद्धी मिळते. याकरिता ते खूप प्रकारचे मेहनत देखील घेत असतात व ज्या ही क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात नाव उज्वल करतात. त्यामुळे या लोकांना समाजामध्ये देखील विशेष स्वरूपाचा मान सन्मान मिळतो.

3- दिसायला असतात आकर्षक सुंदर मुलांक सहा असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकर्षक असते व दिसायला ते सुंदर असतात. शारीरिक दृष्ट्या देखील ते मजबूत असतात व लवकर म्हातारपण येत नाही.

4- कलाप्रेमी असतात रोमँटिक कोणत्याही महिन्याच्या पंधरा किंवा 24 तसेच सहा तारखेला म्हणजेच मुलांक सहा असलेल्या व्यक्ती आयुष्यामध्ये खूप कलाप्रेमी असतात व सौंदर्याकडे लवकर आकर्षित होण्याचा गुण त्याच्यामध्ये असतो. महत्त्वाचे म्हणजे ते आयुष्यामध्ये रोमँटिक देखील असतात व आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात. जोडीदाराला ते कुठल्याही विपरीत काळामध्ये खंबीरपणे साथ देतात व जोडीदाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts