Numerology Secrets 2025 : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. अंकशास्त्रामध्ये, आपण एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारीखावरून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व कसे आहे याचा अंदाज घेऊ शकतो. अंकशास्त्राद्वारे आपण व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल जाणून घेऊ शकतो.
ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार एक राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरून मूलांक काढला जात असतो आणि राशी चिन्हांप्रमाणे प्रत्येक मूलांक संख्या देखील कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते.
अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचा मुळांक हा एक ते नऊ दरम्यान असतो. अशा परिस्थितीत आता आपण सहा मुळांकाच्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व तसेच त्यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
या लोकांचा मूळांक 6 असतो
अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर या 12 पैकी कोणत्याही महिन्याच्या 6,15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक हा सहा असतो. अंकशास्त्रात 6 मुलांक असणाऱ्या लोकांचा शासक ग्रह शुक्र मानला जातो.
यामुळे या रॅडिक्स नंबरच्या व्यक्तीला आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही आणि हे लोक आपले जीवन परिपूर्ण सुख-सुविधांमध्ये जगतात. असे मानले जाते की या मूलांकाचे लोक आर्थिक बाबतीत खूप भाग्यवान असतात.
ते सुरुवातीपासूनच विलासी जीवन जगतात आणि यांच्या जीवनात चैनीची कमतरता नसते. त्यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते. या लोकांचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक असते, त्यामुळे ते कोणालाही सहजपणे स्वतःकडे आकर्षित करतात.
याशिवाय, हे लोक खूप मेहनती असतात आणि केवळ त्यांच्या मेहनतीच्या जोरावर जीवनात यश मिळवतात. 6 तारखेला जन्मलेल्या लोकांना समाजात खूप मान सन्मान मिळतो. याशिवाय हे लोक अतिशय आनंदी स्वभावाचे असतात, पण खूपक खर्चीक सुद्धा असतात.
त्यांना महागड्या वस्तूंची आवड असते. या लोकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही मतभेदांनाही सामोरे जावे लागते. या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस हा सर्वात शुभ दिवस मानला जातो.