कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तीन तारखांना जन्मलेल्या मुली असतात प्रचंड रागीट आणि खर्चिक ! कितीही पैसा असला तरी पुरतं नाही

अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्म तारखेला विशेष महत्त्व असते. व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला झाला आहे त्यावरूनच त्या व्यक्तीच्या भूतकाळाची, भविष्यकाळाची माहिती जाणून घेता येते. 

Published on -

Numerology Secrets : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिष शास्त्राचा एक अविभाज्य भाग आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्र यांना विशेष मान असतो तर दुसरीकडे अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व दिले जाते. अंकशास्त्र असे सांगते की व्यक्तीच्या केवळ जन्म तारखेवरून त्याच्या भूतकाळाची, त्याच्या भविष्य काळाची किंबहुना त्याच्या वर्तमान काळाच्या परिस्थितीबाबत सुद्धा भाकीत वर्तवता येणे शक्य आहे.

तज्ञ सांगतात की अंकशास्त्रामध्ये मुळांकावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची आणि स्वभावाची माहिती जाणून घेता येते. मुलांक हा व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरून काढला जातो. दरम्यान आज आपण अशाच एका मुलांकाच्या मुलींच्या स्वभावाची माहिती पाहणार आहोत.

मुलांक कसा काढला जातो? 

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा 2+4 = 6 असतो. तसेच कोणत्याही महिन्याच्या म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर यापैकी कोणत्याही महिन्याच्या 18 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा 1+8 = 9 असतो.

तसेच कोणत्याही महिन्याच्या दोन तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा दोन असतो. 19 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक 1+9=10 = 1+0=1 असतो. म्हणजेच मुलांक हा एक ते नऊ दरम्यान गणला जातो. 

या तारखांना जन्मलेल्या मुलींचा स्वभाव असतो प्रचंड रागीट आणि खर्चिक 

अंकशास्त्रानुसार ज्या मुलींचा मुलांक 9 असतो त्या मुली प्रचंड रागीट असतात आणि खर्चिक सुद्धा असतात. नऊ मुलांक म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या मुली या स्वभावानेच धाडसी असतात.

या मुलींचे धाडस त्यांना साहसी उपक्रमांमध्ये इतरांपेक्षा वेगळं बनवते. या मुली साहसी खेळांमध्ये चांगली कामगिरी करतात. मात्र यांचा एक मायनस पॉईंट असतो, तो म्हणजे या मुलींना फारच लवकर राग येतो.

अगदीच छोट्या छोट्या गोष्टींवरून या मुली रागावतात. मात्र या मुली कितीही रागीट असल्या तरी देखील यांना सासर मात्र टॉप क्लास मिळत, लग्नानंतर यांना सासरी खूपच मान सन्मान मिळतो. या मुलींचे प्रेम प्रकरण अडचणीचे असते.

प्रेमात या मुलींना यश मिळण्याची शक्यता फारच कमी असते. कोणत्याही महिन्याच्या या तीन तारखांना जन्मलेल्या मुलींना प्रेमाच्या बाबतीत अडचणींचा सामना करावा लागतो. या मुली जेवढ्या अधिक रागावतात तेवढ्याच मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची शक्यता सुद्धा असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!