Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचाचं एक भाग. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. व्यक्तीच्या केवळ जन्म तारखे वरून त्याची संपूर्ण जन्म कुंडली निघू शकते असा दावा अंकशास्त्रात होतो. व्यक्तीच्या केवळ जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मूळांकावरून त्या व्यक्तीचा भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सांगितला जाऊ शकतो.
तसेच त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्याच व्यक्तिमत्व कसे आहे ? त्याच्यातील अवगुण कोणते आहेत ? याबाबतही माहिती मिळते असे अंकशास्त्र सांगते. अंकशास्त्रानुसार व्यक्तीचा जन्म तारखेच्या बेरजेवरून मूळांक काढला जात असतो. अर्थातच कोणत्याही महिन्याच्या अकरा तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक हा 1+1 = 2 असतो.
तसेच कोणत्याही महिन्याच्या दोन तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक हा दोन असतो. दरम्यान आज आपण मूळांक सात असणाऱ्या लोकांबाबत माहिती पाहणार आहोत. अशा लोकांचा स्वभाव कसा असतो त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते? यासंदर्भात आता आपण डिटेल माहिती जाणून घेऊयात.
कोणत्या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूळांक सात असतो?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोणत्याही महिन्याच्या म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर यापैकी कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक सात असतो.
मुलांक 7 असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
ज्या लोकांचा मूळांक सात असतो असे लोक प्रचंड आळशी स्वभावाचे असतात. असे लोक कोणत्याही क्षेत्रात असले तरी आळशीचं पाहायला मिळतात. यामुळेच त्यांना कित्येकदा नोकरी आणि व्यवसायात नुकसान देखील सहन करावे लागते.
असे लोक कोणत्याही प्रकारचे काम अगदीच संथगतीने करतात. काही प्रसंगी हे लोक थेट कामालाच नकार देतात. पण, या मुळांकाच्या लोकांची एक खासियत सुद्धा असते. 7 मूलांक असलेले लोक आळशी असतात पण खूपचं चतुर असतात.
या लोकांना कोणतीही गोष्ट पटकन समजते. मात्र चतुर असले तरी देखील त्यांना आपला आळशी स्वभाव करिअरमध्ये ग्रोथ करताना नडतो. कधीकधी त्यांचा हा संथपणा त्यांच्या प्रगतीच्या आड येतो. ज्यामुळे त्यांचे खूप जास्त नुकसान होते. करिअरमध्ये ग्रोथ करायला त्यांना खूपच उशीर होतो.
त्यांच्या या आळशी स्वभावामुळे अनेकदा त्यांच्या समोर आलेल्या चांगल्या संधी हूकतात. या लोकांचे रिलेशन देखील खराब होते. या लोकांची नाती जास्त दिवस टिकत नाहीत. या लोकांचे शारीरिक आरोग्य देखील आळशी स्वभावामुळे खराब होण्याची भीती असते.
या लोकांच्या स्वभावाचा काही लोक फायदा घेतात आणि त्यांची फसवणूक सुद्धा होते. पण, या लोकांचा एक चांगला गुण म्हणजे हे लोक चतुर तर असतातच शिवाय हे लोक नेहमीच नवनवीन गोष्टी शिकत असतात. यामुळे या लोकांना आपल्या आयुष्यात आळशी स्वभाव असून सुद्धा चांगली संधी मिळण्याची शक्यता असते.