Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक भाग आहे. यामध्ये अंकांना विशेष महत्त्व असते असे जाणकार लोक सांगत असतात. अंकशास्त्रामध्ये फक्त जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयीची गूढ माहिती जाणून घेता येणे शक्य असल्याचा दावा जाणकारांच्या माध्यमातून केला जातो. अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या केवळ जन्मतारखेवरून त्याचा मुळांक काढला जातो आणि हाच मुळांक त्या व्यक्तीची सर्व जन्म कुंडली आपल्यासमोर ठेवतो.
दरम्यान आज आपण अशाच एका विशिष्ट मुळांकाची माहिती जाणून घेणार आहोत. मुळांक हा एक ते नऊ दरम्यान असतो. खरे तर सध्या विधानसभा निवडणुकीचा काळ आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणी मंडळी प्रचाराच्या कामात व्यस्त असल्याचे दिसते.
अशा परिस्थितीत आज आपण अशा एका मुलांकाची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामुळे अंकाचे लोक राजकारणात मोठे नाव कमावत असतात. या मुलांकाचे लोक एक उत्कृष्ट राजकारणी होतात आणि समाजकार्य करून राजकारणात मोठे नाव कमावतात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कोणत्या मुळांकाचे लोक होतात यशस्वी राजकारणी
यासाठी सर्वप्रथम आपण मूळांक कसा काढायचा हे थोडक्यात समजून घेऊयात. जर समजा तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 11 तारीख आहे. म्हणजेच तुमचा मूळांक 1+1=2 असणार आहे. याच पद्धतीने कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक हा चार असतो. हे मुळांक असणारे लोक यशस्वी राजकारणी होतात.
अनेक मोठ्या राजकारणाचा मुळांक हा चार आढळून येतो. राजकारणात येऊन हे लोक मोठे नाव कमावतात आणि आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये मानसन्मान मिळवतात. या लोकांवर सूर्य देवाचा आणि गुरु ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. या लोकांचा स्वभाव हा खूपच फ्रेंडली म्हणजेच मनमिळाऊ स्वरूपाचा असतो.
यामुळे या लोकांचे लवकर मित्र बनतात आणि हाच गुण या लोकांना एक उत्कृष्ट नेता बनवतो. या लोकांवर आपल्या मित्रांच्या संगतीचा विशेष प्रभाव असतो. मित्रांच्या संगतीवरून या लोकांना एक तर फायदा होतो किंवा मग तोटा देखील होऊ शकतो.
या लोकांकडे असणारा नेतृत्व गुण यांना पॉलिटिक्स मध्ये उच्च दर्जाचे स्थान मिळवून देतो. हे लोक अगदीच बालपणापासून हुशार असतात मात्र कोणतीच गोष्ट हे गांभीर्याने घेत नाही हा यांचा तोटा देखील आहे. यामुळे अनेकदा हे लोक आपल्या ध्येयाकडे लवकर पोहोचत नाही तर काही प्रसंगी ध्येय सुद्धा सुटते.
हे लोक आपल्या मित्रांवर विशेष प्रेम करतात मात्र अनेक प्रकरणात असे आढळून आले आहे की मित्रच या लोकांचा घात करतात. या लोकांना जर राजकारणाची गोडी लागली तर हे सक्रिय राजकारणात चांगला प्रभाव पाडताना दिसतात. स्वभाव फारच फ्रेंडली असल्याने या लोकांना आजूबाजूला असणाऱ्या आप्तेष्टांकडून, मित्रमंडळी कडून तसेच गावकऱ्यांकडून चांगले प्रेम मिळते.