Old Pension Scheme : 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून लवकरात लवकर ही NPS योजना रद्दबातल करत ओपीएस योजना पुन्हा एकदा लागू करण्याची मागणी कर्मचारी करत आहेत.
विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील इतरही राज्यात या योजनेविषयी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांचा असंतोष पाहता पश्चिम बंगाल राजस्थान छत्तीसगड झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील कर्मचाऱ्यांना ओ पी एस योजना पुन्हा एकदा लागू झाली आहे.
यामुळे महाराष्ट्रात ही योजना पुन्हा लागू करण्यासाठी सरकार पुढे नेमक्या काय अडचणी आहेत हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. यामुळे आता ओ पी एस योजना लागू करण्यासाठी राज्य कर्मचारी आक्रमक झाले आहेत. नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आता हिवाळी अधिवेशनावर कर्मचारी मोर्चा काढणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील हजारो कर्मचारी महात्मा गांधी यांचा आदर्श ठेवत सेवाग्राम वर्धा ते नागपूर विधिमंडळावर पेन्शन संकल्प यात्रा काढणार आहेत. तसेच आता राज्य कर्मचारी जो ओ पी एस योजना लागू करेल त्यालाच येत्या निवडणुकीत मत देऊ अशी भूमिका बोलून दाखवत आहेत.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेमार्फत पेन्शन संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा 25 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान राहणार आहे. विशेष म्हणजे संघटनेमार्फत याबाबत एक परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही ओपीएस योजना लागू करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे.
दरम्यान आता हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता लक्षात घेता संघटने कडून या यात्रेच आयोजन झालं असल्याने कर्मचाऱ्यांसमवेत सर्व जाणकार लोकांचे याकडे लक्ष लागून आहे. या यात्रेचे फळ काय मिळत हे खरंच पाहण्यासारखं राहणार आहे.