Old Pension Scheme Latest News : जुनी पेन्शन योजनेवरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठे वादंग उठले आहे. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांकडून एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजना रद्दबातल करून जुनी पेन्शन योजना अर्थातच ओ पी एस पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना बहाल करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.
यासाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला कायमच निवेदने देण्यात आली आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर शासनाकडून सकारात्मक असा निर्णय घेतला जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्मचारी आक्रमक बनत आहेत. दरम्यान कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता देशातील वेगवेगळ्या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यास सुरुवात केली आहे.
राजस्थान, पश्चिम बंगाल, झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात ऑलरेडी जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. दरम्यान या मागणीसाठी कर्नाटक मध्ये देखील राज्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. कर्नाटकमधील राज्य कर्मचाऱ्यांनी यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलन सुरू होऊन मात्र काही तासांचा कालावधीच उलटला होता की राज्य शासनाने आंदोलनाचा धसका घेतला आहे. बोम्मई सरकारने आंदोलनाच्या काही तासातच राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मुख्यमंत्री मुंबई यांनी 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जुनी पेन्शन योजनेसाठी देखील समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय पाहता कर्नाटक राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांनी आपल्या आंदोलन स्थगित केल आहे. निश्चितच आता ही समिती कर्नाटक राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत काय अहवाल सादर करते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.
मात्र कर्नाटक राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांनी केलेला आंदोलन आणि त्यानंतर जुनी पेन्शन योजनेबाबत बोम्मई सरकारने स्थापित केलेली समिती यामुळे निश्चितच जुनी पेन्शन योजनेबाबत महाराष्ट्रात देखील राज्य कर्मचारी आक्रमक बनणार आहेत. विशेष म्हणजे 14 मार्चपासून राज्यातील कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. अशातच आता कर्नाटक सरकारने ओ पी एस योजनेबाबत समिती गठित केली असल्याने महाराष्ट्रात देखील कर्मचाऱ्यांचा संप हा आक्रमक होणार आहे.