Old Pension Scheme : महाराष्ट्रात विधान परिषदा निवडणुकीच्या प्रचारात जुनी पेन्शन योजनेवरून राजकारण मोठ तापला आहे. ओ पी एस योजना लागू करण्याचा मुद्दा आता या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. एक महिन्याभरापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओपीएस योजना कदापि राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही असं सांगत होते.
मात्र आता फडणवीस यांचे मतपरिवर्तन झाले असून 25 जानेवारी रोजी औरंगाबाद मध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी ओपीएस योजना लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचा दावा ठोकला. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या या वक्तव्यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्य कर्मचाऱ्यांना ओपीएस लागू करण्यासाठी आम्ही सकारात्मक विचार करत असल्याचे सांगितले.
एवढेच नाही तर मुख्यमंत्री महोदय यांनी शिक्षण विभाग यावर अभ्यास करत असल्याचे त्यावेळी बोलले. दरम्यान आता या जुनी पेन्शन योजनेबाबत ग्रामविकास राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी देखील एक मोठी माहिती दिली आहे. गिरीश महाजन यांनी सांगितले की, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.
एवढेच नाही तर मंत्रिमहोदयांनी ही योजना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातच बंद झाल्याचा आरोप केलाय. शिवाय जुन्या पेन्शनबाबत शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक असून लवकरच ही योजना लागू केली जाईल, अशी माहितीही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
निश्चितच सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता ग्रामविकास राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी ओपीएस योजना राज्य कर्मचाऱ्यांना पुन्हा बहाल केली जाऊ शकते आणि शिंदे फडणवीस सरकार त्यासाठी सकारात्मक असल्याचे बोलत असल्याने जुनी पेन्शन योजना आता खरच राज्य कर्मचाऱ्यांना लागू होईल का? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मात्र, विपक्ष कडून यावर मोठा हल्लाबोल देखील केला जात आहे. एकंदरीत गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे ओपीएस योजनेला पुन्हा एकदा फोडणी दिली गेली असून विधान परिषदा निवडणुका झाल्यानंतर आता ओपीएस योजना लागू करण्यासाठी शासनाकडून हालचाली होतात का विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.