स्पेशल

कामाची बातमी ! ‘या’ राज्यात सुरू झाली जुनी पेन्शन योजना ; महाराष्ट्रात पण होणार, असे होतील या योजनेचे फायदे

Old Pension Scheme : शिंदे-फडणवीस सरकारने ओपीएस योजना लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आज आपण जुनी पेन्शन योजना लागू झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होईल याविषयी जाणून घेणार आहोत. तसेच आतापर्यंत कोणत्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

या राज्यात पुन्हा सुरु झाली जुनी पेन्शन योजना

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेश राज्यात ही योजना लागू झाली आहे. विशेष म्हणजे जाणकार लोकांनी असा दावा केला आहे की, हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेसने ओ पी एस योजना पुन्हा बहाल करू असा वादा केला असल्याने काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी पुन्हा एकदा काबीज झाली आहे.

आणि सत्तेनंतर काँग्रेसने देखील आपल्या वायद्यावर खरे उतरत जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता. तसेच मागच्या काही काळात आम आदमी पार्टीनं पंजाबमध्ये तर काँग्रेसनं छत्तीसगड, हिमाचल आणि मध्य प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू केलीय.

जुनी पेन्शन योजना लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना मिळणारे हे फायदे

जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना पुन्हा बहाल झाली तर कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या निम्मे रक्कम पेन्शन म्हणून देऊ केली जाणार आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला किंवा इतर कायदेशीर वारसाला त्या कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 30 टक्के रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीला किंवा इतर वारसाला त्याच्या मरेपर्यंत उपलब्ध होणार आहे.

म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ३० हजार असेल तर जुनी पेन्शन योजनेता १५ हजार पेन्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला या ठिकाणी 9 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजेच जुनी पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची आणि कौटुंबिक पेन्शनची हमी देण्यात आली आहे.

तसेच जुनी पेन्शन कर्मचाऱ्याला जर लागू झाली तर त्याला स्वःताच्या पगारातून रक्कम द्यावी लागणार नाही. दरम्यान नवी पेन्शनमध्ये दर महिन्याच्या पगारातून १० टक्के रक्कम कर्मचारी आणि त्यावर १४ टक्के रक्कम सरकार देतं.

या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब अशी की, जर आता महाराष्ट्र राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली तर राज्य कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पेन्शन ही ९१ हजारांपर्यंत मिळू शकणार आहे. मात्र नवी पेन्शन योजनेत जास्तीत जास्त पेन्शन ही ७ ते ९ हजारांपर्यंतच पेन्शन देण्याचे प्रावधान आहे.

Old Pension Scheme : शिंदे-फडणवीस सरकार लागू करण्याच्या तयारीत असलेली जुनी पेन्शन योजना नेमकी आहे तरी कशी, पहा डिटेल्स

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts