Onion Rate : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दरम्यान याच दिवाळी सणाच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कांद्याचे बाजार भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. खरे तर गत काही दिवसांपासून कांद्याचे दर तेजीत आहेत.
यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. लोकसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना कांदा अगदीच कवडीमोल दरात विकावा लागला होता. मात्र निवडणुकीनंतर कांदा बाजारभावात चांगली सुधारणा झाली असून यामुळे शेतकरी सुखावले आहेत.
मार्केटमधील ही तेजी आगामी काही दिवस अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होत नाही तोपर्यंत कांद्याला चांगला दर मिळत राहील असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील अनेक बाजारांमध्ये नवीन कांदा आवक पाहायला मिळत आहे मात्र कांद्याची आवक ही फारच लिमिटेड दिसत आहे. हेच कारण आहे की सध्या मालाला चांगला दर मिळतोय. यामुळे यंदाची कांदा उत्पादकांची दिवाळी ही आनंदात साजरा होईल अशी आशा आहे.
सध्या राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याचे कमाल दर हे 5000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सरासरी बाजार भाव हे देखील चार हजार रुपये प्रतिक्विंटल च्या आसपास पोहचले आहेत.
दरम्यान आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मार्केटमध्ये आज लाल कांद्याची 31 हजार 684 क्विंटल आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 500, कमाल 5500 आणि सरासरी 2600 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा सोलापूर एपीएमसीच्या खालोखाल दर मिळालेत. पिंपळगाव बसवंत एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 2501, कमाल 5252 आणि सरासरी चार हजार तीनशे असा भाव मिळाला.