Onion Rate : गत दोन दिवसांपासून दीपोत्सवाचा सण सुरू आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून दीपोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.
दीपोत्सवाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. आज दीपोत्सवाच्या सणातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजेच नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातोय.
दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. मात्र असे असले तरी राज्यातील काही बाजारांमध्ये आज कांद्याचे लिलाव झालेत.
अशा परिस्थितीत आज आपण नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील कोणत्या बाजारांमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील या बाजारात कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज २८० क्विंटल तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज ७४३४ क्विंटल कांदा आवक झाली.
हे दोन बाजार वगळता राज्यातील इतर बाजारांमध्ये कांद्याचा लिलाव झाला नाही. दरम्यान, आजच्या लिलावात छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला कमीत कमी २०० रुपये
आणि सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालच्या तुलनेत आज दोनशे क्विंटल ने कमी आवक झाली आणि सरासरी दर 350 प्रतिक्विंटल ने वाढला.
तसेच पुण्यात लोकल कांद्याला कमीतकमी २००० रुपये तर सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कालच्या तुलनेत पुणे येथे आज १४८८ क्विंटल कमी आवक
तर सरासरी २०० रुपयांनी अधिक दर होता. एकंदरीत नरक चतुर्दशीच्या दिवशी झालेल्या लिलावात या दोन्ही बाजारांमध्ये कांद्याचे सरासरी दर वाढले आहेत