स्पेशल

अहिल्यानगर जिल्ह्यात आज कांद्याला काय भाव मिळाला ? वाचा सविस्तर

Onion Rate : लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव तेजीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. पण नुकतेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्यातील प्रमुख पक्षांच्या माध्यमातून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत अहिल्या नगर जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.

अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला काय भाव मिळतोय

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज 37,736 गोणी गावरान कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या बाजारात 1 नंबर कांदा 4000 ते 4600, 2 नंबर 3200 ते 4000, 3 नंबर 2100 ते 3200, 4 नंबर 1000 ते 2100 रुपये प्रति क्विंटल या दरात विकला गेला. तसेच लाल कांद्याची चाळीस हजार 494 गोणी आवक झाली होती. यात 1 नंबर कांद्याला 3400 ते 4000, 2 नंबर 2700 ते 3400, 3 नंबर 1500 ते 2700, 4 नंबर 500 ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज 4 हजार 43 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 1500, कमाल 5000 आणि सरासरी 3250 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तसेच उन्हाळी कांद्याला किमान पंधराशे, कमाल 4900 आणि सरासरी 3200 असा भाव मिळाला.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 473 क्विंटल लाल कांदा आवक झाली होती. या मालाला किमान 200, कमाल 4000 आणि सरासरी 2100 असा भाव मिळाला.

कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान 1200, कमाल 2551 आणि सरासरी 2200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात एक नंबर कांद्याला किमान 3500, कमाल 4500 आणि सरासरी चार हजाराचा भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला किमान 2400 कमाल 3400 आणि सरासरी 2750 असा भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला कीमान 700, कमाल 2200 आणि सरासरी 1250 असा भाव मिळाला.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 300 कमाल 4400 आणि सरासरी 3200 असा भाव मिळाला.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : इथे उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 4400 आणि सरासरी 3800 असा भाव मिळाला.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts