प्रत्येकाला आपल्या घरासमोर चारचाकी असावी हे स्वप्न असते व त्याकरिता प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. तसेच आजकालच्या तरुण-तरुणींमध्ये तर कार घेण्याची क्रेझ फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अगदी नोकरी लागल्यानंतरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच कार खरेदी करण्यासाठी तरुणाई आपल्याला उत्सुक असल्याचे दिसून येते.
परंतु सध्या कारच्या किमती जर पाहिले तर बऱ्याच कारच्या किमती ह्या खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण होण्यास यामुळे अडचण निर्माण होते. कारण साधारणपणे नवीन कार घ्यायचे म्हटले म्हणजे चार ते पाच लाख रुपयांचा बजेट असणे गरजेचे असते.
त्यामुळे बरेच व्यक्ती हे सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्याचा पर्याय निवडतात. यामध्ये तुमच्या बजेटमध्ये कार तर तुम्हाला मिळतेच परंतु कार घेण्याचे स्वप्न देखील तुमचे पूर्ण होते.
याच पद्धतीने जर तुम्हाला सेकंड हॅन्ड कमी बजेट मध्ये कार हवी असेल व तुमचे कारचे स्वतः पूर्ण करायचे असेल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी अल्टो या सेकंड हॅन्ड कारचे मॉडेल तुम्हाला फक्त पन्नास हजारापासून एक लाखापर्यंत मिळू शकते.
मारुती सुझुकी अल्टो मिळेल तुम्हाला पन्नास हजारापासून एक लाखापर्यंत
कमी बजेटमध्ये तुम्हाला कारचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्ही मारुती सुझुकी अल्टो या कारचे सेकंड हॅन्ड मॉडेल खरेदी करू शकतात. हे मॉडेल तुम्ही फक्त 50000 पासून ते एक लाखापर्यंत खरेदी करू शकतात. जर तुम्हाला सेकंड हॅन्ड मारुती अल्टो घ्यायची असेल तर ओएलएक्स वर सध्या ती उपलब्ध असून या प्लॅटफॉर्मवर या कारचे 2011 चे मॉडेल लिस्ट करण्यात आले आहे.
तसेच या कारची ओनरशिप दुसरी असून याचे रजिस्ट्रेशन दिल्ली येथील आहे. तसेच ही कार तुम्हाला फक्त 65 हजार रुपयांपर्यंत मिळणे शक्य होणार आहे. तसेच DROOM या प्लॅटफॉर्मवर देखील सेकंड हॅन्ड मारुती अल्टो खरेदी करण्याची सुवर्णसंधी असून या ठिकाणी गुरुग्राम येथील रजिस्ट्रेशन असलेली कार विक्रीसाठी उपलब्ध आहे.
हे 2012 चे मॉडेल असून याची पहिली ओनरशिप आहे. यामध्ये मालकाने या कारची किंमत 90 हजार रुपये सांगितले असून यामध्ये फायनान्स प्लॅन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे.
तसेच QUIKR या प्लॅटफॉर्मवर देखील मारुती अल्टोचे 2013 चे मॉडेल उपलब्ध आहे. या कारची ओनरशिप पहिली असून विक्रेत्याने एक लाख वीस हजार रुपये या कारची किंमत सांगितली आहे.
विशेष म्हणजे यावर तुम्हाला फायनान्स प्लान सुद्धा दिला जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला सेकंड हॅन्ड मारुती सुझुकी अल्टो घ्यायची असेल तर तुम्ही या तिन्ही पर्यायांपैकी तुम्हाला परवडेल त्या पर्यायाचा विचार करू शकता.