स्पेशल

सॅमसंगचा ‘हा’ 85 हजारांचा जबरदस्त 5G फोन 35 हजारांत घेण्याची संधी, जाणून घ्या ऑफर

Samsung offers : सध्या दिवाळीचा हंगाम सुरु आहे. विविध ईकॉमर्स साईटवर विविध सेल लागले आहेत. फ्लिपकार्टवर देखील बिग दिवाळी सेल लागला आहे. या सेलमध्ये Samsung Galaxy S22 5G फोनवर 53 टक्के डिस्काउंट मिळत आहे.

तसेच विविध ऑफर्स असणारे बँक कार्ड जर वापरले तर 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटदेखील मिळू शकतो. जर तुम्ही Samsung Galaxy S22 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. कारण सध्या फोनवर 53% पर्यंत सूट दिली जात आहे.

डिस्काउंट मिळाल्यानंतर या फोनची किंमत 39,999 रुपये होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या फोनवर एक्सचेंज ऑफर घेतल्यास त्याची किंमत 35 हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. आता या फोनच्या फीचर्सबद्दल माहिती घेऊ –

53% डिस्काऊंटचा फायदा घेण्याची संधी

सॅमसंगचा हा फोन 85,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. फ्लिपकार्टच्या दिवाळी सेल ऑफरदरम्यान या फोनवर 53% सूट दिली जात आहे, ऑफर डिस्काउंटनंतर या फोनची किंमत 39,999 रुपये होईल आणि एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. एक्सचेंज ऑफर घेतल्यास यावर 35 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

मस्त आहे कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल बॅक कॅमेरा आहे, जो 50 एमपी + 12 एमपी + 10 एमपीचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 10MP चा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

उत्तम स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये 6.1 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. याचे डिस्प्ले रिझोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल असून डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात सॅमसंगच्या एक्सीनॉस 2200 प्रोसेसरचा समावेश करण्यात आला असून फोनला IP68 रेटिंग सपोर्टही देण्यात आला आहे.

योग्य संधी

तुम्हाला जर फोन घ्यायचा असेल तर हा सेल तुमच्यासाठी चांगली संधी ठरेल. कारण याफोनवर सध्या जो डिस्काउंट सुरु आहे तो प्रचंड आहे. याचा पुरेपूर फायदा घेतला तर तुमची खूप साऱ्या पैशांची बचत होईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts