Ops Scheme News : 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल केलेली नाही. मात्र कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणी करत आहेत.
दरम्यान आता या ओ पी एस योजनेवरून संपूर्ण राज्यात वादंग उठल आहे. अशा परिस्थितीत आज आपण ओपीएस योजनेचे नेमके फायदे काय याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जुनी पेन्शन योजनेचे फायदे खालील प्रमाणे :-
जर ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना पुन्हा बहाल झाली तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. एवढेच नाही तर या योजनेत कौटुंबिक पेन्शनचीं देखील हमी आहे. म्हणजे ओ पी एस धारक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला किंवा इतर कायदेशीर वारसाला त्या कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 30 टक्के रक्कम मरेपर्यंत पेन्शन स्वरूपात मिळण्याचे प्रावधान आहे.
आता आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ही योजना समजून घेऊया. समजा, जर एखाद्या कर्मचाऱ्याला ओ पी एस योजना लागू असेल आणि त्याचा पगार ३० हजार असेल तर त्याला सेवानिवृत्तीनंतर १५ हजार पेन्शन मिळणार आहे. एवढेच नाही तर अशा कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत असताना मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला या ठिकाणी 9 हजार रुपये पेन्शन मिळण्याचे देखील प्रावधान आहे. म्हणजेच जुनी पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची आणि कौटुंबिक पेन्शनची हमी या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आली आहे.
ओ पी एस योजनेची अजून एक विशेषता ती म्हणजे कर्मचाऱ्याला पेन्शन मिळवण्यासाठी स्वःताच्या पगारातून रक्कम द्यावी लागत नाही. दरम्यान नवी पेन्शनमध्ये दर महिन्याच्या पगारातून १० टक्के रक्कम कर्मचारी आणि त्यावर १४ टक्के रक्कम सरकार देतं असते. म्हणजेच नवीन पेन्शन स्कीम ही अंशदायी पेन्शन योजना आहे.
या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब अशी की, जर आता महाराष्ट्र राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली तर राज्य कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पेन्शन ही ९१ हजारांपर्यंत मिळू शकणार आहे. मात्र नवी पेन्शन योजनेत जास्तीत जास्त पेन्शन ही ७ ते ९ हजारांपर्यंतच राहणार आहे.
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेचे लोण राज्यभर पसरणार ; ‘या’वेळी लाखो कर्मचारी संपावर जाणार