स्पेशल

शेतकऱ्यांची बल्ले बल्ले! 8 दिवस अगोदरच मान्सूनच आगमन; ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार Monsoon, पंजाब डख यांचा अंदाज

Panjab Dakh : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, यंदा मान्सून बाबत प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. विशेषतः अमेरिकन हवामान विभागाच्या अल निनोच्या इशाऱ्यानंतर देशातील सर्वच स्तरावर मान्सून बाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

कुणी यंदा मानसून कमकुवत राहणार अशी भविष्यवाणी करत आहे तर कोणी यावर्षी मान्सून नेहमीप्रमाणेच समाधानकारक राहणार असा अंदाज वर्तवत आहेत.

दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे यंदा मान्सून आठ दिवस अगोदरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हो, बरोबर ऐकताय तुम्ही यंदा मान्सूनचे आगमन आठ दिवस पूर्वीच होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा मान्सूनपूर्व हवामान अंदाज; अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात ‘या’ तारखेला पडणार मान्सूनपूर्व पाऊस, मान्सूनच आगमनही लवकरच, पहा…

पंजाब डक यांनी काल अर्थातच 13 मे 2023 रोजी याबाबत मोठी माहिती दिली आहे. डख यांच्या मते यंदा मान्सूनचे आगमन 22 मे च्या सुमारास अंदमान मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हाच तिथे एक चक्रीवादळही तयार होणार आहे. या चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात लवकर होण्याचा अंदाज त्यांनी बांधला आहे.

गेल्या एका महिन्यापूर्वी पंजाब डख यांनी मान्सूनचे आगमन आठ जूनला होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आता डख यांनी मान्सूनचे आगमन एक जून 2023 रोजी महाराष्ट्रात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एक जूनला राज्यात पावसाला सुरुवात होणार असून हा पाऊस मान्सूनचा राहणार आहे. 1 जून ते 3 जून दरम्यान राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. 

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘अस’ झालं तर तिकीट असतानाही तुम्हाला दंड भरावा लागणार, काय सांगतो रेल्वेचा नियम, पहा….

निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही माहिती अतिशय महत्त्वाची असून मान्सूनचे वेळेआधी होणारे आगमन यंदाही मान्सून दमदार राहणार असल्याचे संकेत आहेत. एकंदरीत खरीप हंगामाची पूर्वतयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

मे महिन्यात कसं राहणार हवामान

दरम्यान मे महिन्यात 20 मे 2023 पर्यंत तापमानात वाढ कायम राहणार आहे. तसेच या कालावधीमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तापमान 45 अंश डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक राहण्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे. 20 मे नंतर मात्र वातावरणात बदल होणार असून 21 मे ते 23 मे दरम्यान राज्यातील काही भागात भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो, असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा :- शेअर आहे का कुबेरचा खजाना ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिला 3,050 टक्क्याचा परतावा, 1 लाखाचे बनलेत किती?, पहा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts