Panjab Dakh : पंजाबरावांनी नुकताच एक नवीन हवामान अंदाज वर्तवला होता. यामध्ये त्यांनी नऊ ऑक्टोबरच्या सायंकाळी पावसाला सुरुवात होणार असे म्हटले होते. यानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये नऊ ऑक्टोबर पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 9 ऑक्टोबरला सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, हिंगोली या भागाकडून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला होता.
यानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यांकडून पावसाला सुरुवात झाली असून आता हळूहळू हा परतीचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापत आहे. कालपासून राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे.
इतरही अन्य जिल्ह्यांमध्ये सध्या परतीच्या पावसाची तीव्रता वाढलेली दिसते. अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून आता किती दिवस महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू राहणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
यामुळे आज आपण पंजाब रावांचा सविस्तर हवामान अंदाज नेमका काय सांगतोय, पंजाब रावांनी आणखी किती दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 9 ते 18 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.
या काळात राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा परतीचा पाऊस राहणार असून हा शेवटचा पाऊस राहील. या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे ज्यांनी खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण केलेली असेल त्यांनी त्यांचा शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, या परतीच्या पावसाचा रब्बी हंगामातील गहू, हरभरा सारख्या पीक पेरणीत मोठा फायदा होणार आहे. हा परतीचा पाऊस गहू आणि हरभरा सारख्या रब्बी हंगामातील पिकांना वरदान ठरणार असल्याचा दावा पंजाबरावांनी केला आहे.
पंजाब रावांच्या म्हणण्याप्रमाणे, नऊ ते 18 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, जालना, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात पावसाची तीव्रता सर्वात जास्त राहणार असा अंदाज आहे.
विदर्भात मात्र या काळात पावसाची तीव्रता इतर विभागापेक्षा थोडीशी कमी राहू शकते. विदर्भातील पूर्व आणि पश्चिम भागातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये या काळात पावसाचा जोर थोडासा कमी राहणार असे मत पंजाब रावांनी वर्तवले आहे.
तथापि, उद्यापासून विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आता परतीचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून या परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे.
तसेच हा परतीचा पाऊस पुढील सात ते आठ दिवस म्हणजेच 18 ऑक्टोबर पर्यंत सक्रिय राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या कामाचे नियोजन आखावे असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.