Panjab Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदलले आहे. राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पंजाब रावांनी देखील राज्यात आगामी काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 29 डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरू होणार आहे. 27 ते 29 डिसेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी जाहीर केला आहे.
कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार?
यवतमाळ नांदेड लातूर परभणी हिंगोली अकोला वाशिम शेगाव अकोट खामगाव अचलपूर अमरावती जळगाव जामोद संग्रामपूर देऊळगाव राजा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर कन्नड भोकरदन बीड धाराशिव पंढरपूर तुळजापूर सोलापूर जत पुणे या भागात 27 ते 29 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सांगलीमध्ये फक्त 27 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. दुसरीकडे परतवाडा आणि चिखलदरा या भागात या कालावधीमध्ये गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी वर्तवला आहे. या अनुषंगाने या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांचे विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी पंजाबरावांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो?
भारतीय हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या संबंधीत जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यातील काही तज्ञांनी यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते असे मत यावेळी वर्तवले आहे. नक्कीच भारतीय हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे आणि पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
गारपिटीमुळे तर हातात तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. त्यामुळे सध्या राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि आता रब्बी हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणार अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.