Panjab Dakh News : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात आणखी काही दिवस हवामान कोरडे राहील मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली.
या काळात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 29 ते 30 नोव्हेंबर पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
30 नोव्हेंबर नंतर मात्र राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानाला सुरुवात होणार आहे. पंजाबराव सांगतात की दरवर्षी 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होत असतो. हा आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे. दरम्यान सालावादाप्रमाणे यंदाही डिसेंबरच्या सुरुवातीला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात 30 नोव्हेंबर पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहील थंडीचे तीव्रता कायम राहील मात्र त्यानंतर राज्यात पाऊस सुरू होणार आहे. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे यावर्षी एक डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार असे सुद्धा पंजाबरावांनी यावेळी नमूद केले आहे. ते सांगतात की 29 नोव्हेंबर च्या दरम्यान बंगालच्या खाडीत एक चक्रीवादळ तयार होणार आहे.
या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 29 आणि 30 तारखेच्या दरम्यान तामिळनाडूला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान तामिळनाडू मधला हा पाऊस आंध्र प्रदेश कडून मग आपल्या महाराष्ट्राकडे येणार आहे. महाराष्ट्रात आंध्र प्रदेश कडून पाऊस येईल आणि राज्यात एक ते चार डिसेंबर दरम्यान पाऊस होणार असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे.
म्हणून या काळात राज्यातील थंडीची तीव्रता देखील कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे, रब्बी हंगामातील शेती पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. रब्बी हंगामातील गहूं, भरभरा तसेच कांदा पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.
मका ज्वारी सारख्या पिकांची देखील यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून ही सुद्धा पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. डाळिंब, द्राक्ष यांसारख्या फळबागा देखील महत्त्वाच्या स्टेजला आहेत.
अशा स्थितीत जर पाऊस झाला तर नक्कीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार यात शंकाच नाही. तथापि पंजाबरावांचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.