स्पेशल

पंजाबराव डख यांची मोठी माहिती; मे महिन्यातही अवकाळी पाऊस; जून महिन्याच्या ‘या’ तारखेला मान्सून करणार एन्ट्री ! ‘असा’ राहणार यंदाचा पावसाळा

Panjabrao Dakh Breaking News : यंदाच्या मान्सून बाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत. यंदा दुष्काळ पडेल असा अंदाज काही तज्ञांनी वर्तवला असून अमेरिकन हवामान विभागाने देखील यावर्षी भारतासह संपूर्ण आशिया खंडात दुष्काळाचे संकेत दिले आहेत.

अशातच पंजाबराव डखं या परभणीच्या हवामान तज्ञाचा मान्सून 2023 चा अंदाज समोर आला आहे. अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत पंजाबराव डख यांनी मान्सून 2023 बाबत एक मोठी माहिती दिली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर; ‘या’ कारणामुळे तुरीचे दर जाणार 9 हजार पार !

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीचा मान्सून हा समाधानकारक राहणार आहे. गेल्या वर्षी ज्या पद्धतीने समाधानकारक पाऊस पडला तसाच पाऊस यंदा म्हणजेच 2023 च्या मान्सून मध्ये पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मान्सून 2023 बाबत माहिती देताना डक यांनी सांगितले की, यावर्षी आठ जूनला महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन अर्थातच एन्ट्री होणार आहे. तसेच मान्सूनची एन्ट्री झाल्यानंतर 22 जून पासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर जून अखेरपर्यंत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणी आटोपली जाईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी जून महिन्यापेक्षा जुलैमध्ये आणि जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अधिक पाऊस राहणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी निघाली; तुमचा नंबर लागला की नाही?, पहा…..

कस राहणार एप्रिल आणि मे महिन्यातील हवामान

डखं यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा एप्रिल रोजी म्हणजे आज राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. आज अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच उद्यापासून अर्थातच 11 एप्रिल पासून ते 13 एप्रिल पर्यंत उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यानंतर 13 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार असून हवामान कोरडे राहणार आहे.

मात्र 16 ते 18 एप्रिल पर्यंत राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असेल. एवढेच नाही तर मे महिन्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. पंजाबरावांच्या मते मे महिन्यात दोनदा अवकाळी पाऊस पडणार आहे. 

हे पण वाचा :- कलिंगड शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; 10 गुंठ्यातला प्रयोग ठरला लाख मोलाचा, पहा ही यशोगाथा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts