Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. खरे तर गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. काल तर राज्यात कुठेच पाऊस झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय.
खरे तर मान्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. कांदा, द्राक्ष, डाळिंब, सारख्या, फळपिकांना या पावसाचा फटका बसत होता. मात्र, आता पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय.
दरम्यान, पंजाब रावांनी महाराष्ट्रात येत्या काही दिवसांनी पुन्हा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी दिवाळीच्या सणाला सुरुवात होईल आणि याच दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला गेला आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याचे हवामान रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी सर्वाधिक पोषक आहे. या काळात रब्बी पिकांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. कारण की आता जोरदार थंडीला सुरुवात होईल.
आज पासून सकाळी धुई आणि धुके मोठ्या प्रमाणात दिसेल आणि हे थंडीच्या आगमनाची चाहूल असल्याचे संकेत देतात. आता काही दिवस पावसाचा जोर ओसरलेला राहणार आहे. यामुळे हा काळ चना पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट असून ज्या शेतकऱ्यांची हरभरा अर्थातच चना पेरणी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर पेरणी पूर्ण करून घ्यावी.
कारण की दिवाळीत पुन्हा पाऊस पडू शकतो. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 30 आणि 31 ऑक्टोबर तसेच एक, दोन आणि तीन नोव्हेंबरला पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता आहे. तसेच पाच नोव्हेंबर पासून थंडीची तीव्रता वाढणार आहे.
आज पासून पाच दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील मात्र दिवाळीच्या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर पासून ते तीन नोव्हेंबर पर्यंत राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊनच आपल्या शेती कामांचे नियोजन आखावे, आणि ज्यांनी रब्बी पिकांची पेरणी केलेली नसेल त्यांनी पेरणी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दिवाळीमध्ये पावसाची शक्यता असली तर पावसाचे प्रमाण फार अधिक राहणार नाही असेही जाणवत असल्याचे बोलले जात आहे.