Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्राला परतीचा पाऊस झोडपून काढणार असे म्हटले आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आता नऊ ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे.
नऊ ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार असे डख यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राकडून पावसाला सुरुवात होईल.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात होणार आणि यानंतर मग पावसाची व्याप्ती वाढणार असे पंजाब रावांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये म्हटले आहे.
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे राज्यातील सांगली, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक, कोकणपट्टी, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, जालना, छत्रपती संभाजी नगर या भागात नऊ ते 14 ऑक्टोबर दरम्यान दररोज भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे.
मात्र या कालावधीत राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार असेही पंजाब डख यांनी स्पष्ट केले आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या भागात पावसाचे प्रमाण फारच कमी राहील असा अंदाज आहे.
त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचे काही कारण नाही. मात्र असे असले तरी सोयाबीन व इतर खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर लगेचच शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात नऊ तारखेपासूनच पावसाचा जोर वाढणार आहे मात्र सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, धाराशिव कडील भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र पावसाची व्याप्ती 9 ऑक्टोबर पासूनच वाढणार आहे. हा परतीचा पाऊस असून हा पाऊस महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणार असा अंदाज आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी पंजाबरावांचा हा हवामान अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन आखावे. जाणकार लोकांनी पावसाची शक्यता लक्षात घेता पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असा सल्ला दिला आहे. खरेतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
मात्र आता नऊ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पण हा परतीचा पाऊस रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरू शकतो. रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू पिकासाठी या पावसाचा फायदा होणार आहे.