Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. या चक्रीवादळामुळे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अगदीच मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडू, कर्नाटक, पुदुचेरीसारख्या राज्यांमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला. याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळाला.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे राज्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेच्या माध्यमातून समोर आला आहे.
पुणे वेधशाळेने कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. 19 आणि 20 तारखेला महाराष्ट्रात पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे. पंजाबरावांनी देखील मागील आपल्या एका अंदाजात महाराष्ट्रात पाऊस पडणार असे म्हटले होते.
मात्र आज पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी अवकाळी पाऊसासंदर्भात एक मोठी माहिती दिली आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील हवामानात बदल होणार आहे. पण फार मोठा पाऊस पडणार नाही.
त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात 21 ते 26 डिसेंबर दरम्यान ढगाळ हवामान राहणार अशी शक्यता वर्तवली आहे. या काळात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
त्यांनी आपल्या आधीच्या हवामान अंदाजात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती. 21 ते 26 डिसेंबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असे त्यांनी आपल्या पहिल्या अंदाजात म्हटले होते. मात्र या आपल्या नवीन हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात फक्त ढगाळ हवामान राहणार असे म्हटले आहे.
या काळात राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो मात्र उर्वरित ठिकाणी फक्त ढगाळ हवामान राहणार अशी शक्यता आहे. राज्यात फार मोठा पाऊस पडणार नाही मात्र ढगाळ हवामान राहील. यामुळे ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक बातमी ठरणार आहे.
या काळात राज्यातील पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आणि छत्तीसगड तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे. राज्यात या कालावधीमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे आणि यामुळे थंडीचे प्रमाणही कमी होईल असेही त्यांनी आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे.