Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील हवामान पूर्णपणे बदलल आहे. जानेवारी महिन्याची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली मात्र आता राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत असून किमान तापमानात देखील वाढ झालीये. अशातच, भारतीय हवामान खात्याने उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज दिला आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. गेल्या महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस झाला होता आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान आता जानेवारी महिन्यातही असेच परिस्थिती पाहायला मिळू शकते असे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे.
असे असतानाच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवा अंदाज दिला आहे. पंजाबरावांनी आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे 17 जानेवारी पर्यंत राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली आहे.
आज महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आभाळ आले आहे, ढगाळ हवामान तयार झाले असल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.
पण पंजाबरावांनी राज्यात 17 तारखेपर्यंत ढगाळ हवामान राहील. या काळात अगदीच एक-दोन ठिकाणी रिमझिम पाऊस पडू शकतो. या काळात फार काही मोठा पाऊस पडणार नाही थोडाफार पाऊस होईल.
नुकसानकारक पाऊस पडणार नाही असे पंजाबरावांनी स्पष्ट केले असून शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 12 जानेवारीपासून ते 17 जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान राहील पण मोठा पाऊस पडणार नाही.
या काळात अगदीचं तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे. मात्र मोठा पाऊस पडणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. आज 12 जानेवारी रोजी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे.
पण मोठा पाऊस राहणार नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी सुरू असेल त्यांनी बिनधास्त कांदा काढणी करून घ्यावी कारण की फार मोठा पाऊस पडणार नाही आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोणतेच नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही.
कांदा समवेतच सध्या राज्यातील शेतकऱ्यांची तुर पिकाची काढणी सुरू आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी देखील तूर काढणी करून घ्यावी, असा सल्ला पंजाबरावांनी यावेळी दिला आहे.
तसेच पंजाबरावांनी 17 तारखेनंतर म्हणजेच 18 जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण वाढेल असे म्हटले असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा हवामान बिघडेल आणि त्यावेळी महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता राहील असे सांगितले आहे.