Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. एक सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर गणरायाच्या आगमनाच्या दिवशी अर्थात सात सप्टेंबरला पावसाला सुरुवात झाली.
सात सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस झाला. मात्र जसा सप्टेंबर च्या सुरुवातीला पाऊस झाला होता तसा पाऊस या काळातही झाला नाही. दरम्यान 11 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला आहे.
अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आजपासून अर्थातच 21 सप्टेंबर पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार असा नवीन अंदाज जारी केला आहे. पंजाबरावांच्या नवीन हवामान अंदाजानुसार आज दुपारपासून पावसाला सुरुवात होणार आहे.
21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 11 ते 12 दिवसांच्या काळात राज्यात सर्व दूर जोरदार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या काळात अगदी ओढे नाले भरून वाहतील अशा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रातील सर्वच गावांमध्ये या काळात किमान तीनदा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. पंजाबराव सांगतात की महाराष्ट्रात 42000 गावे आहेत आणि या गावांमध्ये 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यानच्या काळात किमान तीनदा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार कालच पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच आज लातूर नांदेड सोलापूर या भागाकडे जरा चांगल्या पावसाची शक्यता आहे. आज दुपारनंतर राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे आज रात्री राज्यातील सर्वच भागांमध्ये पावसाची हजेरी लागणार अशी शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. पंजाबराव म्हणतात की आजपासून पावसाला सुरुवात होईल मात्र उद्यापासून अर्थातच 22 सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यात जवळपास 2 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान राज्याच्या उत्तर महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जनतेने सावध राहणे अपेक्षित आहे.
उत्तर महाराष्ट्र अर्थातच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये या काळात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता पंजाबराव यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. या काळात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पुर येण्याची शक्यता देखील पंजाब प्रमाणे वर्तवली आहे.
यामुळे या नदीच्या काठी वसणाऱ्या नागरिकांनी अधिक सावध राहणे अपेक्षित आहे. पंजाब रावांच्या नवीन हवामान अंदाजानुसार आज पासून पुढील दहा ते बारा दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला देखील राज्यात पाऊस पडणार आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवात ज्याप्रमाणे जोरदार पावसाने झाली तसेच सुरुवात ऑक्टोबर महिन्याची देखील होणार आहे.