Panjabrao Dakh Havaman Andaj : रब्बी हंगामासाठी पूर्व मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित देशातून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे.
तथापि भारतीय हवामान खात्याने राज्यात आगामी काही दिवस अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. यावर्षी दिवाळीपर्यंत स्थानिक वातावरण होऊन महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून समोर आला आहे.
दुसरीकडे पंजाब रावांनी महाराष्ट्रातून मान्सून अजून माघारी फिरलेला नाही असे जाहीर केले असून राज्यात आगामी काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज पासून अर्थातच 19 ऑक्टोबर पासून ते 21 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ते म्हणालेत की, जाता जाता मान्सून महाराष्ट्राला चांगला झोडपून काढणार आहे.
आज पासून पुढील 3 दिवस राज्यातील यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बुलढाणा, अमरावती, अकोला, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर (अहमदनगर), नाशिक आणि कोकण किनारपट्टी भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
खानदेशातील नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात मात्र या काळात पावसाची तीव्रता फारच कमी राहिल असा अंदाज पंजाबरावांकडून वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, पंजाब रावांनी 22 ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातून, 23 ऑक्टोबरला मराठवाड्यातून आणि 24 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असे भाकीतही यावेळी त्यांनी वर्तवले आहे.
याशिवाय, यंदा थंडीला उशिराने सुरुवात होणार असे दिसते. पंजाब रावांच्या अंदाजानुसार यावर्षी 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
यामुळे आता पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का? हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. तथापि, पावसाची शक्यता लक्षात घेऊनचं शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन आखावे जेणेकरून त्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार नाही.
मात्र सध्या जो पाऊस सुरु आहे त्याचा फायदा आगामी रब्बी हंगामाला होणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकातून चांगली कमाई होईल अशी शक्यता आहे.