Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पंजाब रावांनी नुकताच एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. खरंतर, महाराष्ट्रात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली होती. या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दणका दिला. सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या भागात पावसाने हजेरी लावली होती.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या काळात पावसाने दणका दिल्याने आता पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत शेतकऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान आता याच संदर्भात पंजाब रावांनी एक नवीन अंदाज जारी करत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाब डख यांनी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवा अंदाज जारी केला आहे. पंजाबराव ने सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्रातील पावसाचे सावट दूर झाले आहे. मध्य महाराष्ट्रातील या संबंधित जिल्ह्यात देखील आता हवामान कोरडे झाले आहे.
महाराष्ट्रात आता पाऊस पडणार नाही असे पंजाब रावांनी म्हटले आहे. आता राज्यात थंडीची तीव्रता वाढत जाणार आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आता पावसापासून नव्हे तर थंडीपासून त्यांच्या द्राक्ष बागेची काळजी घ्यायची आहे. थंडीपासून द्राक्ष बागांचे संरक्षण करण्यासाठी आता शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात असा सल्ला डख यांनी यावेळी दिला आहे.
मात्र सध्याचे हवामान गहू आणि चना पेरणीसाठी पोषक आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचा गहू आणि हरभरा पेरणी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर पेरणीचे कामे पूर्ण करून घ्यावेत असेही पंजाब रावांनी यावेळी म्हटले आहे.
पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आता जवळपास 28 नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे आणि थंडी वाढत जाणार आहे.
28 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही असे पंजाब रावांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे. पण 29 तारखेनंतर देशातील तामिळनाडू राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल.
30 तारखेच्या दरम्यान तिरुपती बालाजीला जाणाऱ्या नागरिकांनी तिकडे जोरदार पाऊस होणार असल्याने याची दक्षता घ्यावी, असेही पंजाब रावांनी म्हटले आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात आता पाऊस पडणार नाही.