Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या एका चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला होता.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान देखील पाहायला मिळाले होते. दरम्यान, आता राज्यात पुन्हा एकदा तशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. पंजाबराव सांगतात की, राज्यात 20 डिसेंबर पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
या काळात राज्यात अगदीच कडाक्याची थंडी पडणार आहे. मात्र, 21 नंतर हवामान बिघडणार असल्याने शेतकऱ्यांनी 20 डिसेंबर पर्यंत कांदा काढणीची कामे पूर्ण करून घ्यावीत.
19 ते 20 डिसेंबर पर्यंत ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी कांदा काढणीची कामे पूर्ण करून घ्यावीत, कारण की 21 तारखेनंतर राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र अर्थातच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा सहित राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता या काळात पाहायला मिळेल.
सर्वत्र अवकाळी पाऊस पडणार नाही मात्र भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्यावेळी राज्यात हलका पाऊस झाला होता मात्र यावेळी महाराष्ट्रात जोरदार अवकाळी पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान आणखी वाढेल अशी भीती आहे.
या काळात राज्यातील अनेक भागात भाग बदलत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला असून हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र असे असले तरी राज्यात 19 पर्यंत थंडीची लाट राहणार आहे.
19 पर्यंत जोरदार थंडी पडेल, नंतर वीस तारखेला राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान पाहायला मिळेल आणि 21 डिसेंबर 2024 रोजी राज्यात पावसाला सुरुवात होईल आणि जवळपास 26 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून यावेळी समोर आला आहे.
दुसरीकडे 17 ते 19 डिसेंबर दरम्यान तामिळनाडू, विशेषता तिरुपतीकडे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या काळात जे लोक तिरुपतीला दर्शनासाठी जाणार असतील त्यांनी विशेष काळजी घ्यावी असेही पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे.